Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात 27 एप्रिलपासून उष्णतेची लाट

हवामान विभागाचा इशारा ; तीन दिवस उष्णतेच्या झळा

पुणे ः राज्यात अवकाळीचा जोर कमी होत नाही तोच पुन्हा एकदा उष्णतेची लाट जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात 27 ते 29 एप्रिल

खटाव तालुक्यातील येळीव तलावात माती माफियांचा रात्रं-दिवस धुडगूस
बस-फॉर्च्युनरच्या टक्करमध्ये ९ जणांचा मृत्यू, ३२ जखमी
पावसाळयापूर्वी सर्व मंजूर रस्त्यांची कामे पूर्ण करा

पुणे ः राज्यात अवकाळीचा जोर कमी होत नाही तोच पुन्हा एकदा उष्णतेची लाट जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात 27 ते 29 एप्रिल या तीन दिवसांमध्ये उष्णतेची तीव्र लाट असण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबईसह विदर्भात या उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे.
हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी बुधवारी पत्रकारांना याबाबत माहिती दिली. ’उष्णतेची लाट अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे आहे. या प्रक्रियेमुळे ठाणे, रायगड आणि मुंबईच्या काही भागात पारा वरच्या दिशेने जाईल, असं त्यांनी सांगितले. मैदानी भागात किमान 40 अंश सेल्सिअस, किनारपट्टीभागात 37 अंश सेल्सिअस आणि डोंगराळ भागात 30 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचल्यास उष्णतेची लाट आली असे अधिकृतपणे म्हटले जाते. आर्थिक राजधानी मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी एप्रिल महिन्यात जारी करण्यात आलेला हा दुसरा उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. 15 आणि 16 एप्रिल रोजी मुंबई आणि नवी मुंबईत काही ठिकाणी तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते, त्यामुळे तीव्र उष्ण हवामानाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. देशभरात उष्णतेच्या दिवसांमध्ये वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने 21 एप्रिल रोजी व्यक्त केला होता. एप्रिलमध्ये सर्वसाधारणपणे एक ते तीन दिवस अति उष्णतेचे असतात. यावेळी ते चार ते आठ दिवस असतील असा अंदाज आहे. एप्रिल ते जून या संपूर्ण कालावधीत 10 ते 20 दिवस उष्णतेची लाट येऊ शकते आणि काही भागात 20 दिवसांपेक्षा जास्त उष्णतेची लाट येऊ शकते. आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, झारखंड, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मराठवाडा, ओडिशा आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाचे म्हणणे आहे. तीव्र उष्णतेमुळे पॉवर ग्रीडला धोका निर्माण होण्याची शक्यता असून देशाच्या विविध भागांत पाणीटंचाई निर्माण होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

COMMENTS