https://youtu.be/iw6_zd-wM20 "आधी जिल्हा परिषद, मग छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि आता विधान परिषदेची जागा सुद्धा भाजपने आपल्याकडे घेतली! भाजप आ
“आधी जिल्हा परिषद, मग छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि आता विधान परिषदेची जागा सुद्धा भाजपने आपल्याकडे घेतली! भाजप आमच्या शिवसेनेला संपवायला निघालंय!”… हा थेट आणि गंभीर आरोप कुणी विरोधी पक्षाने नाही, तर महायुतीचेच माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी केलाय. सत्तारांची ही जाहीर नाराजी, त्यातच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत व्यक्त केलेली इच्छा, आणि लगेचच खासदार संजय राऊतांनी शिंदेंच्या नेत्यांसाठी ‘मातोश्री’ची दारं उघडी असल्याचा दिलेला मेसेज! महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एका मोठ्या भूकंपाची स्क्रिप्ट लिहिली जातेय का? फक्त सत्तारच नाही, तर भाजपने अशा अनेक जागांवर शिंदेंच्या नेत्यांची कोंडी केलीये, ज्यामुळे हे नेते पुन्हा ‘मातोश्री’ची वाट धरू शकतात. कोण आहेत हे नेते? पाहुयात या व्हिडिओमध्ये..

COMMENTS