Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘वंचित’चे पुन्हा एकला चलो रे ?

लोकसभेसाठी तीन उमेदवारांची नावे जाहीर

मुंबई ः महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी झाला असला तरी, समान कार्यक्र्रमाचा मसुदा अजूनही तिन्ही पक्षांकडून न आल्यामुळे आणि जागा वाटपा

वंचितच्या समावेशाबद्दल 15 दिवसात निर्णय घ्या
मविआ-वंचितची बोलणी फिस्कटली ?
‘वंचित’ लोकसभा निवडणुक स्वतंत्र लढणार

मुंबई ः महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी झाला असला तरी, समान कार्यक्र्रमाचा मसुदा अजूनही तिन्ही पक्षांकडून न आल्यामुळे आणि जागा वाटपाबाबत स्पष्टता नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स या सोशल मीडियावर महाविकास आघाडीच्या बैठका आणि कार्यक्रमांना वंचितच्या कार्यकर्त्यांनी जाऊ नये, कारण युतीवर अजुनही शिक्कामोर्तब झाले नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर वंचितने लोकसभेचे आपले तीन उमेदवार जाहीर केल्यामुळे वंचित जागा वाटप करण्यासाठी दबावाचे राजकारण तर करत नाही ना ? किंवा वंचित स्वबळावर लढण्याची तयारी तर करत नाही ना, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.
अकोल्यातून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर लढणार असल्याचे फायनल आहे. यासोबतच वर्धातून प्रा. राजेंद्र साळुंखे लढणार असल्याचे समोर आले आहे. वर्धा जिल्हा कार्यकारिणीने तशी घोषणाच केली आहे. तर सांगलीतून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचे नाव समोर आले आहे. जिल्हा कार्यकारिणीने वरील नावांवर शिक्कामोर्तब केले असले तरी, वंचितचे प्रमुख नेते अ‍ॅड. आंबेडकर किंवा पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी अधिकृत नावे जाहीर केलेली नाही. त्यामुळे वंचित आघाडी महाविकास आघाडीकडून जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबाव वाढवत आहे की, स्वबळावर लढण्याची तयारी वंचितने पूर्ण केली आहे, याबाबत अजूनही संभ्रम आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारीत केला आहे. ज्यामध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या बैठका किंवा कार्यक्रमांना हजेरी लावू नये, असे म्हटले आहे. ‘एक्स’वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाही. तेव्हा इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला बोलावत असतील तर त्या बैठकी, कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये असे आवाहन केले आहे. त्यामुळे वंचितचे अजूनही तळ्यात-मळ्यात असल्याचे दिसून येत आहे.  महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीला प्रकाश आंबेडकर यांना घ्यावे की नाही? यावरुन बराच खल झाला. प्रकाश आंबडेकर यांनी तीनही पक्षांच्या नेत्यांनी वंचितला सोबत घ्यायचे असेल तर तसे लेखी निवेदन द्यावे, असे म्हटले होते. प्रकाश आंबेडकर अखेर मविआत आले खरे, पण आता जागावाटपावरून त्यांचा मविआच्या नेत्यांशी विसंवाद असल्याचे दिसून येत आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांची सूचना येईपर्यंत कोणीही सहभागी होऊ नये. लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले आहेत, तरीही मविआमधील प्रमुख चारही पक्षांमध्ये जागावाटपावर एकमत झालेले पाहायला मिळत नाही.

अकोला, सांगली, वर्धासाठी वंचित मैदानात – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने अकोला, वर्धा, सांगलीसाठी उमेदवारांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे मागील लोकसभेप्रमाणे यंदाही वंचित एकला चलो रेची भूमिका घेण्याची दाट शक्यता आहे. तशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अकोल्यातून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, वर्ध्यातून राजेंद्र साळुंखे आणि सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील लढण्याची शक्यता आहे. वरील उमेदवार लढणार असल्याचे प्रस्ताव स्थानिक कार्यकर्त्यांनी बैठका घेऊन घोषित केले असले तरी, वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी अधिकृतरित्या यावर शिक्कामोर्तब केलेले नाही. त्यामुळे वंचित महाविकास आघाडीवर दबाव वाढवत असल्याची चर्चा सुरू आहे.

COMMENTS