Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरे गटाच्या खासदारांसोबत बैठक झाली नाहीगुप्त बैठकाच्या पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांचे स्पष्टीकरण

मुंबई : ठाकरे गटातील खासदार फुटणार असून त्यांच्यासोबत गुप्त बैठक पार पडल्याच्या चर्चांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लाव

भारतातील इंधन गॅस टंचाई : वास्तव की कृत्रिम संकट ?
कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातील प्रगतीही महत्त्वाचीमंत्री चंद्रकांत पाटील; 65 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन प्रसंगी विविध कला पुरस्कारांचे वितरण
महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक पॉवर हाऊस : मुख्यमंत्री फडणवीस; ब्रिटनमधील खासदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट


मुंबई : ठाकरे गटातील खासदार फुटणार असून त्यांच्यासोबत गुप्त बैठक पार पडल्याच्या चर्चांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. अशा प्रकारच्या बातम्या पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि राजकीय हेतूने पसरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात ठाकरे गटातील काही खासदार सत्ताधारी गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. लवकरच मोठे पक्षांतर होऊ शकते, अशीही वावडी उठवली जात होती. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देताना शिंदे यांनी ठामपणे सांगितले की, अशी कोणतीही बैठक झालेली नाही आणि त्यामागे कोणतेही वास्तव नाही. शिंदे म्हणाले की, गेल्या दीड वर्षांपासून अशा प्रकारच्या बातम्या सातत्याने पसरवल्या जात आहेत. मात्र त्यात काडीमात्र सत्य नाही. जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे आणि अनावश्यक राजकीय वातावरण तापवणे, हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सूचित केले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, ठाकरे गटातील खासदारांसोबत कोणतीही गुप्त किंवा औपचारिक बैठक झालेली नाही. अशा प्रकारचे वृत्त केवळ अफवा असून माध्यमांनीही सनसनाटीपणापेक्षा जबाबदारीने वागावे, असे आवाहन त्यांनी केले. या स्पष्टीकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘खासदार फुटी’च्या चर्चांना आता आळा बसला आहे. संबंधित बातम्या या केवळ राजकीय स्टंटचा भाग असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. दरम्यान, खासदार नरेश म्हस्के यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, अशा प्रकारची कोणतीही बैठक झालेली नाही. विरोधकांकडून किंवा त्याच गटातील काही व्यक्तींमार्फत लोकप्रतिनिधींची बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. म्हस्के यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील अनेक खासदार विविध कारणांनी एकत्र येत असतात. सामाजिक किंवा औपचारिक निमित्ताने भेटणे ही सामान्य बाब आहे. त्यामुळे अशा भेटींना वेगळा अर्थ लावून चुकीच्या बातम्या पसरवू नयेत. तसेच, खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधातही पक्षांतर्गत मतभेदांमधूनच अफवा पसरवल्या जात असाव्यात, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS