Homeताज्या बातम्या

धनंजय मुंडे-पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 500 विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप पुण्यात शानूर भाई शेख यांच्या पुढाकारातून शिक्षणाला प्रोत्साहन; मान्यवरांची उपस्थिती

चकलांबा: माजी मंत्री धनंजय मुंडे आणि पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरातील प्रभाग क्र. 17, रामटेकडी येथील

प्रा. किशोर वाघमारे यांना ‘महाराष्ट्र लोकनायक आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर; शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव
भ्रष्टाचारमुक्त पार्टीचे देशव्यापी जनआंदोलन ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत भ्रष्टाचाराविरोधात एल्गार
वांबोरीतील विठ्ठल मंदिर वाद चिघळला; कथित भेदभाव व स्वयंघोषित ट्रस्टविरोधात ग्रामस्थांचा धडक मोर्चा

चकलांबा: माजी मंत्री धनंजय मुंडे आणि पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरातील प्रभाग क्र. 17, रामटेकडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉलमध्ये 500 गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य, वह्या आणि पुस्तकांचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते शानूर भाई शेख यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर निलेशदादा मगर होते, तर नगरसेविका हेमलताताई मगर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना उपमहापौर निलेशदादा मगर म्हणाले, शानूर भाई शेख यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राबविलेला हा उपक्रम प्रेरणादायी आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या सामाजिक विचारांपासून प्रेरणा घेऊन प्रत्येक कार्यकर्त्याने अशा समाजोपयोगी उपक्रमात सहभागी व्हावे. नगरसेविका हेमलताताई मगर यांनीही शानूर भाई शेख यांच्या समाजसेवेचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमास अ‍ॅड. नासर्जन हक्कानी, वसीमभाई शेख, हाफिज फयाज मौलाना, प्राचार्या निखत मॅडम, समीर शेख, उज्वला जाधव, अल्ताफ तांबोळी, नबी पटेल, मतीन शेख, मोसीन सय्यद, सलमान शेख, शारिक खान, शादाब खान यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते. यावेळी शानूर भाई शेख म्हणाले, धनंजय दादा आणि पंकजा ताई हे नेहमीच समाजहिताचे कार्य करतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचा हा छोटासा प्रयत्न असून, भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील. शिक्षणाला प्रोत्साहन देणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम परिसरात विशेष कौतुकाचा विषय ठरला.

COMMENTS