Homeव्हिडीओ

“शिवसेनेचं मुंडकं आमचा मित्रपक्षच उडवतोय!” सत्तारांच्या विधानाने महायुतीत भूकंप?

https://youtu.be/r_FyKEJxSms "शिवसेनेचं मुंडकं आमचा मित्रपक्षच उडवतोय!" सत्तारांच्या विधानाने महायुतीत भूकंप?"आम्ही जो उठाव केला, त्याचं हे फळ आ

विकासकामांमध्ये राजकारण नव्हे जनहिताला प्राधान्यआ. रोहित पवार ; बसस्थानक, जिल्हा उपरुग्णालय, व्यापारी संकुलासह विविध कामांचा आढावा
रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला शेतकरी हक्क मोर्चाचा पाठिंबाफसव्या कर्जमाफी जीआरची गावोगावी होळी करणार-राजेंद्र आमटे
कोकणच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते रोह्यात विविध विकासकामांचा शुभारंभ

“शिवसेनेचं मुंडकं आमचा मित्रपक्षच उडवतोय!” सत्तारांच्या विधानाने महायुतीत भूकंप?
“आम्ही जो उठाव केला, त्याचं हे फळ आम्हाला मिळत असेल… आमच्या सोबत कूटनीती सुरू आहे! काही जणांनी शिवसेना कशी संपेल याचं टेंडर घेतलंय… आज आमची बारी आहे, उद्या इतरांची असेल!”… महायुती सरकारमधील मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे सिल्लोडचे वादग्रस्त आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट आपल्याच मित्रपक्षावर म्हणजेच भाजपवर हा हल्ला चढवलाय. “शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम आमचा मित्रपक्षच करतोय” असं म्हणत सत्तारांनी थेट युती धर्मालाच आव्हान दिलंय. पण अचानक असं काय घडलं की एकनाथ शिंदेंचे सर्वात खंदे समर्थक मानले जाणारे सत्तार इतके आक्रमक झाले? दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, असं म्हणत सत्तारांनी नेमके कोणते भूकंपाचे संकेत दिलेत? शिवसेना आणि भाजप खरोखरच वेगळे होणार का? आणि या संपूर्ण राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू अब्दुल सत्तार ठरणार का? पाहुयात या सविस्तर व्हिडिओमधून…

COMMENTS