Homeताज्या बातम्या

पर्यटन केंद्राच्या निकृष्ट कामाची चौकशी होणार; मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची वन विभागाला कारवाईचे आदेश

शेवगाव : पाथर्डी वनपरिक्षेत्र अंतर्गत उभारण्यात आलेल्या शेवगाव शहरातील पाथर्डी रोडवरील वन पर्यटन केंद्राच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून

कुंभमेळा निधी गैरव्यवहारात सरकारकडून अभय कशासाठी? २२७० कोटींच्या कामांतील निविदांच्या निर्णय प्रक्रियेत मनिषाताई म्हैसकरांची भूमिका संशयास्पद
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वप्नपूर्ती करा; पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांचे शेवगावमधील विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन
अॅमेझॉनला महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्र्यू जॅसी यांना आवाहन

शेवगाव : पाथर्डी वनपरिक्षेत्र अंतर्गत उभारण्यात आलेल्या शेवगाव शहरातील पाथर्डी रोडवरील वन पर्यटन केंद्राच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधित ठेकेदारांवर फौजदारी कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, नाशिक विभागाने वन विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. माहिती अधिकार महासंघाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष शैलेंद्र जायभाये यांनी दिनांक ७ जुलै २०२६ रोजी मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडे पाथर्डी वनपरिक्षेत्रातील पर्यटन केंद्राच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत तक्रार अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाची दखल घेत मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, नाशिक विभागाने हा विषय संबंधित वन विभागाशी निगडित असल्याचे नमूद करून पुढील चौकशीसाठी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), नाशिक यांच्याकडे पाठविला आहे. मुख्यमंत्री सचिवालय कक्षाने संबंधित विभागाला शासन नियमांनुसार विहित मुदतीत तातडीने कार्यवाही करून अर्जदारास त्याची माहिती द्यावी तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. शैलेंद्र जायभाये यांनी आपल्या तक्रारीत पाथर्डी वनपरिक्षेत्रातील पर्यटन केंद्राच्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या तक्रारीची प्रत मुख्यमंत्री सचिवालय कक्षाने पुढील चौकशीसाठी संबंधित कार्यालयाकडे पाठविली आहे. या प्रकरणात वन विभागाकडून होणाऱ्या चौकशीकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS