Homeताज्या बातम्या

कुंभमेळा निधी गैरव्यवहारात सरकारकडून अभय कशासाठी? २२७० कोटींच्या कामांतील निविदांच्या निर्णय प्रक्रियेत मनिषाताई म्हैसकरांची भूमिका संशयास्पद

मुंबई: हिंदू धर्मियांचा पवित्र असा सिंहस्थ कुंभमेळा उत्सव तब्बल १२ वर्षांनंतर नाशिक याठिकाणी होऊ घातला आहे. या उत्सवासाठी राज्य सरकारकडून कोट्यवध

ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर अधिवेशनात लक्षवेधी मांडावी; खासदार-आमदारांना डॉ. हंसराज वैद्य यांचे आवाहन
२५ वर्षांपासूनचा डीपीचा प्रश्न अखेर निकाली; नगरसेविका समीक्षा गायकवाड यांच्या पाठपुराव्याला यश
सदाभाऊ खोतांनी आंदोलनकर्त्यांना “आतंकवादी” संबोधल्यावरून वादंग; विरोधकांची टीका, बच्चू कडूंकडूनही विधान मागे घेण्याचा सल्ला
श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर | माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

मुंबई: हिंदू धर्मियांचा पवित्र असा सिंहस्थ कुंभमेळा उत्सव तब्बल १२ वर्षांनंतर नाशिक याठिकाणी होऊ घातला आहे. या उत्सवासाठी राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला असून, याप्रकरणी तब्बल २२७० कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. या निविदा प्रक्रियेत मुख्य निर्णय घेण्याची जबाबदारी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम अतिरिक्त मुख्य सचिव मनिषाताई म्हैसकर यांच्यावर होती. त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळेच यात मोठा अपहार झाला असून, शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे पुराव्यावरून दिसून येत आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, नाशिकचे तत्कालीन मुख्य अभियंता प्रशांत औटी तसेच तत्कालीन सार्वजनिक बांधकाम अतिरिक्त मुख्य सचिव मनिषाताई म्हैसकर यांनी काही निविदाधारकांना झुकते माप दिल्याचे दिसून येत आहे. सिंहस्थ कुंभमेळा टप्पा-१ मधील कामांची यादी बघितली तर, काम क्रमांक १२ मध्ये जानोरी-ओझर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते राष्ट्रीय महामार्ग-६० चौपदरी रस्त्याचे व्हाईट टॉपिंग काँक्रीट बांधकाम करणे (प्रजिमा-५० किमी १३/०० ते १४/००, व रा. मा. ३७ किमी १३३/७०० ते १३७/७०० ता. दिंडोरी जिल्हा नाशिक) या कामांची अंदाजपत्रकीय किंमत ३४ कोटी ४० लाख रुपये आहे. सदर काम हे बी. आर. भदाणे बिल्डकॉन कंपनीला देण्यात आले आहे.

दुसरे काम बघितले तर, नाशिक दिंडोरी वणी नांदुरी रस्ता प्ररामा-०३ वर सा.क्र. ३५/२०० मध्ये उनंदा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे (दिंडोरी-नाशिक) या कामासाठी आर्थिक देकाराचा लिफाफा क्रमांक २ उघडण्यास पात्र ठरलेले निविदाधारक म्हणजे बी. आर. भदाणे बिल्डकॉन कंपनी होय. या कामांची अंदाजपत्रकीय रक्कम ११ कोटी ३८ लाख रुपये आहे.

या संपूर्ण निविदा प्रक्रियेचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगनमताने काही विशिष्ट कंपन्यांना जुजबी कारणे दाखवून त्यांना अपात्र केले, तर विशिष्ट कंपन्यांना ही कामे देण्यात आली. किंबहुना त्यांच्यासाठीच ही प्रक्रिया राबविण्यात आली, असे यातून दिसून येत आहे. त्यामुळे या संपूर्ण २२७० कोटींच्या निविदा प्रक्रियेत गंभीर असा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमण्याची खरी गरज आहे.

मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री झाडाझडती का घेईना?

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यातील गैरव्यवहार प्रकरणाची आम्ही गेल्या ५-६ दिवसांपासून सातत्याने मालिका लावली असून, याप्रकरणात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांकडे बोट दाखवले आहे. याप्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या वर्तनाची तसेच त्यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी करण्याची गरज होती. मात्र तसे होताना दिसून येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री नेमके कोणाला अभय देत आहेत आणि कोणाला वाचवत आहेत, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

COMMENTS