Homeताज्या बातम्या

अल्पसंख्याकांच्या विकासासाठी खा. लंके आक्रमक; सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी केंद्राकडे प्रस्ताव

अहिल्यानगर : अहिल्यानगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक बहुल भागांमध्ये शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, स्वच्छता, रस्ते, कौशल्य विकास आणि

कर्जतमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या; नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याने घेतला गळफास
संगमनेरमध्ये खनानारळाच्या ओटीने प्रवरानदीचे जलपूजन
ई-२० पेट्रोलचे दर ८५ रुपये करा किंवा निर्णय मागे घ्या; अरविंद केजरीवाल यांचा पंतप्रधान निवासस्थानावर मोर्चा!

अहिल्यानगर : अहिल्यानगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक बहुल भागांमध्ये शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, स्वच्छता, रस्ते, कौशल्य विकास आणि इतर मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी पंतप्रधान जन विकास कार्यक्रम अंतर्गत विविध विकासकामांना तातडीने मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरण रिजिजू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

खासदार लंके यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, लोकसभा मतदारसंघातील अनेक अल्पसंख्याक बहुल वस्त्या आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून काही प्रमाणात दूर आहेत. या भागांमध्ये शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अंतर्गत रस्ते, अंगणवाडी, सामुदायिक सुविधा आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण केंद्रांचा अभाव असल्याने नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर, युवकांच्या रोजगाराच्या संधींवर आणि महिलांच्या सामाजिक सक्षमीकरणावर होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

पीएमजेव्हीके ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना असून अल्पसंख्याक बहुल भागांमध्ये सामाजिक आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी ही योजना प्रभावी माध्यम ठरू शकते. त्यामुळे या योजनेअंतर्गत मतदारसंघातील प्राधान्याच्या विकासकामांचा समावेश करून त्यांना तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी खासदार लंके यांनी केली आहे.

निवेदनामध्ये शाळांच्या नवीन इमारती, विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृहे, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे, कौशल्य विकास केंद्रे, सामुदायिक भवन, अंगणवाडी केंद्रे, पिण्याच्या पाण्याच्या योजना, स्वच्छता सुविधा, अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम, गटारे आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे. या सुविधा उभारल्यास नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS