Homeताज्या बातम्या

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वप्नपूर्ती करा; पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांचे शेवगावमधील विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

भातकुडगाव फाटा: अत्यंत सामान्य आणि गरीब कुटुंबातून, वाड्या-वस्त्यांवरून शिक्षण घेत असताना जिद्द, चिकाटी व सततच्या प्रयत्नांमुळे कोणतेही अशक्य ध्य

व्यवस्थापन कोट्याच्या नावाखाली कोट्यवधींचा खेळ? उच्च शिक्षण विभागाचा दणका; शिक्षण सम्राटांच्या अडचणी वाढल्या
आजारपणाला कंटाळून माय-लेकाची आत्महत्या; नागपूरच्या जलालपुरा परिसरातील दुर्दैवी घटना
शेवगावमध्ये स्मार्ट मिटर विरोधात ‘वंचित’चे ठिय्या आंदोलन; महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

भातकुडगाव फाटा: अत्यंत सामान्य आणि गरीब कुटुंबातून, वाड्या-वस्त्यांवरून शिक्षण घेत असताना जिद्द, चिकाटी व सततच्या प्रयत्नांमुळे कोणतेही अशक्य ध्येय साध्य करता येते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वप्नपूर्ती करायला शिका, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी केले.

कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित निर्मलाताई काकडे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शेवगाव येथे प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा ‘स्वागत समारंभ’ आणि ‘करिअर मार्गदर्शन’ कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य व केंद्र शासनाच्या विशेष सेवा पदकाने सन्मानित पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. ए. दुकळे होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. दत्ताराम राठोड म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता अवांतर वाचन, स्पर्धा परीक्षा आणि संशोधनाकडे लक्ष दिले पाहिजे.” त्यांनी आपल्या ३१ पदव्या, ४ पीएच.डी., ६ स्पर्धा परीक्षा आणि नक्षलविरोधी अभियानातील कामगिरीचा प्रवास उलगडून दाखवत विद्यार्थ्यांना उच्च ध्येय बाळगण्याची प्रेरणा दिली.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पी. ए. दुकळे यांनी नवप्रविष्ट विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात स्वागत केले. डॉ. दत्ताराम राठोड यांचा जीवनप्रवास हा सर्वसामान्य कुटुंबातील मुलांसाठी साक्षात प्रेरणेचा स्त्रोत असून, त्यांच्या या प्रवासातून धडा घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात उत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निकिता बोरुडे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. संतोष निजवे यांनी केले, तर आभार डॉ. दादासाहेब जवरे यांनी मानले.

COMMENTS