Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धीवर खासगी बसचा भीषण अपघात;एक मृत्यू, २५ जण जखमी ; रिल्सच्या नादात दुर्घटना

बुलढाणा : नेहमीच अपघातांच्या सत्रामुळे चर्चेत असणाऱ्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. खासगी बस चालक आणि क्लिनरच्या रिल्स बन

शेतकरी आत्महत्या; शवविच्छेदनासाठी नातेवाईकांची दोन तासांची प्रतीक्षा, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
नीट परीक्षा घोटाळ्यातील आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; सामाजिक कार्यकर्ते दिलीपसिंग सोडी यांची राष्ट्रपतींकडे जिल्हाधिकार्‍यांमार्फत मागणी
सोनई आरोग्य केंद्रात ‘आरोग्य अधिकारी’ द्या; नागरिकांची मागणी ; रुग्णांची हेळसांड

बुलढाणा : नेहमीच अपघातांच्या सत्रामुळे चर्चेत असणाऱ्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. खासगी बस चालक आणि क्लिनरच्या रिल्स बनवण्याच्या वेडापायी हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका दीड वर्षाच्या निष्पाप लेकराला जीव गमवावा लागला आहे. तर, २० ते २५ जण जखमी झाल्याचे समोर आले आहे.
मेहकर येथील टोलनाक्याजवळ एका खाजगी लक्झरी बसचा हा अपघात झाला. ही बस वेगात असताना चालक आणि क्लिनर मोबाईलवर रिल्स बनवण्यात गुंग होते. या नादात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस अनियंत्रित होऊन महामार्गावरच पलटी झाली. ही बस एवढ्या जोरात पलटी झाली की ती बाजूने जाणाऱ्या एका चारचाकी वाहनावर जाऊन आदळली. यामध्ये चारचाकी वाहनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  
अपघातानंतर घटनास्थळी प्रवाशांचा प्रचंड आक्रोश ऐकायला मिळत होता. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने या अपघातात एका दीड वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तातडीने उपचारासाठी मेहकरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तिथे एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अखेर जखमींना खाजगी रुग्णालयात हलवावे लागले, तर काही रुग्णांवर स्थानिक नागरिकांनीच प्रथमोपचार केले.

COMMENTS