Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नीट परीक्षा घोटाळ्यातील आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; सामाजिक कार्यकर्ते दिलीपसिंग सोडी यांची राष्ट्रपतींकडे जिल्हाधिकार्‍यांमार्फत मागणी

नांदेड : देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या ‘नीट-2026’ वैद्यकीय प्रवेश परीक्षा घोटाळ्याप्रकरणी दोषींवर अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नांद

शेतकरी आत्महत्या; शवविच्छेदनासाठी नातेवाईकांची दोन तासांची प्रतीक्षा, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
सोनई आरोग्य केंद्रात ‘आरोग्य अधिकारी’ द्या; नागरिकांची मागणी ; रुग्णांची हेळसांड
समृद्धीवर खासगी बसचा भीषण अपघात;एक मृत्यू, २५ जण जखमी ; रिल्सच्या नादात दुर्घटना

नांदेड : देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या ‘नीट-2026’ वैद्यकीय प्रवेश परीक्षा घोटाळ्याप्रकरणी दोषींवर अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नांदेडचे सामाजिक कार्यकर्ते दिलीपसिंग सोडी यांनी केली आहे.  या घोटाळ्यात सहभागी असलेल्या आरोपींची मालमत्ता जप्त करून संबंधित कोचिंग क्लास चालकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी भारताच्या राष्ट्रपतींकडे नांदेड जिल्हाधिकार्‍यांमार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर आणि वैद्यकीय क्षेत्राच्या विश्वासार्हतेवर घाला घालणार्‍या या प्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला असल्याचे सोडी यांनी निवेदनात नमूद केले आहे. मेहनतीने आणि प्रामाणिकपणे परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून पैशांच्या जोरावर गुणवत्तेला दुय्यम स्थान देण्याचा प्रकार देशासाठी अत्यंत घातक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  निवेदनात त्यांनी विशेषतः भविष्यात निर्माण होणार्‍या धोक्यांकडे लक्ष वेधले आहे. जर अशा गैरप्रकारातून पात्र ठरलेले विद्यार्थी पुढे डॉक्टर बनले, तर त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. अपात्र किंवा बोगस डॉक्टरांकडून चुकीचे उपचार होऊन रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा केवळ परीक्षा घोटाळा नसून देशाच्या आरोग्य व्यवस्थेविरोधातील गंभीर कट आहे, असे सोडी यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींची जंगम व स्थावर मालमत्ता तातडीने जप्त करून ती सरकारी तिजोरीत जमा करण्यात यावी, अशी पहिली मागणी त्यांनी केली आहे.  तसेच ज्या कोचिंग क्लास चालकांची नावे या घोटाळ्यात समोर आली आहेत किंवा ज्यांना तपास यंत्रणांनी अटक केली आहे,  त्यांच्यावर देशद्रोहासारखे गंभीर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.  या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करून दोषींना कायद्यातील तरतुदीनुसार कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्ट प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कठोर धोरण आखण्याची गरज असल्याचे मतही सोडी यांनी व्यक्त केले. दरम्यान, नीट परीक्षा घोटाळ्यामुळे देशभरात विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना आणि पालकांकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी सातत्याने केली जात आहे. नांदेडमधून दिलीपसिंग सोडी यांनी उचललेला हा मुद्दा आता राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.

COMMENTS