Homeताज्या बातम्या

सुप्रिया सुळे : महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी PM मोदींची भेट; FCRA विधेयकाला राष्ट्रवादीचा विरोध

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ८ खासदार सोमवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील पाणीप्रश्

खा.सुप्रिया सुळेंनी टोचले पार्थ पवारांचे कान; राष्ट्रवादी पार्थच्या बचावासाठी मैदानात; खा. राहुल गांधींच्या कामगिरीवर प्रश्‍नचिन्ह
सना मलिक यांचे विधान वैयक्तिक, पक्षाचा संबंध नाहीराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी भूमिका केली स्पष्ट
मुख्यत्र्यांची सभा युतीच्या विजयाची नांदी ठरेल : माजी खा. विखे
NCP has not split at all, some took different decision': Supriya Sule hits  out at 'highly confused' Maharashtra govt | Mumbai News - The Indian Express

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ८ खासदार सोमवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील पाणीप्रश्न, शेतकरी आत्महत्या, वाढतं शहरीकरण आणि खासदारांच्या विकासनिधीतील अडचणी याबाबत चर्चा करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.दरम्यान, FCRA दुरुस्ती विधेयकाला सध्याच्या स्वरूपात राष्ट्रवादीचा विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. विधेयक मागे घ्यावं किंवा संयुक्त संसदीय समितीकडे (JPC) पाठवावं, अशी पक्षाची भूमिका आहे.डिलिमिटेशन विधेयक अद्याप आलेलं नाही, त्यामुळे त्यावर सध्या भाष्य करणं योग्य नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. बिल आल्यानंतर इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करून भूमिका ठरवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

COMMENTS