Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकरी आत्महत्या; शवविच्छेदनासाठी नातेवाईकांची दोन तासांची प्रतीक्षा, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

लिंबागणेश : बीड तालुक्यातील बोरखेड येथील शेतकरी लक्ष्मण भानुदास क्षीरसागर (वय 52) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून मंगळवारी (दि.14) दुपारी सुमारे 2

सोनई आरोग्य केंद्रात ‘आरोग्य अधिकारी’ द्या; नागरिकांची मागणी ; रुग्णांची हेळसांड
समृद्धीवर खासगी बसचा भीषण अपघात;एक मृत्यू, २५ जण जखमी ; रिल्सच्या नादात दुर्घटना
नीट परीक्षा घोटाळ्यातील आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; सामाजिक कार्यकर्ते दिलीपसिंग सोडी यांची राष्ट्रपतींकडे जिल्हाधिकार्‍यांमार्फत मागणी

लिंबागणेश : बीड तालुक्यातील बोरखेड येथील शेतकरी लक्ष्मण भानुदास क्षीरसागर (वय 52) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून मंगळवारी (दि.14) दुपारी सुमारे 2 वाजेच्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच लिंबागणेश पोलीस ठाण्याचे कर्मचारी गणेश परझने, मन्सुर शेख व अविनाश घुंगरड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. मात्र, येथे शवविच्छेदनासाठी आवश्यक साधनसामग्री व प्रशिक्षित कर्मचार्‍यांची कमतरता असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश आंधळे यांनी मृतदेह नेकनुर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेमुळे सुमारे दोन तासांचा विलंब झाला. त्यामुळे मयताचे नातेवाईक रामदास क्षीरसागर, नवनाथ क्षीरसागर, दशरथ क्षीरसागर तसेच सरपंच सुनिल अनपट यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. दरम्यान, लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनाची सुविधा नसल्याचा प्रकार यापूर्वीही अनेकदा घडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारंवार अशा घटना घडत असूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. या संदर्भात डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत नाराजी व्यक्त केली. यावर डॉ. गंडाळ यांनी अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदनासाठी आवश्यक मनुष्यबळ व साहित्याची कमतरता असल्याचे मान्य केले. तसेच संबंधित प्रकरणात नेकनुर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचा अभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून, तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

COMMENTS