Homeताज्या बातम्या

फेसबुक-इन्स्टाग्रामला मोठा दणका! मेटाला 9 हजार कोटींचा दंड; तरुणांच्या मानसिक आरोग्याला हानी केल्याचा आरोप

अमेरिकेतील न्यू मेक्सिको न्यायालयाने फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटाला तब्बल 942 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा दंड ठ

रशियाचा युक्रेनवर भीषण हवाई हल्ला; राजधानी कीव्हसह अनेक शहरे हादरली!
इराणला ३०० दशलक्ष डॉलर्स देण्याचा दावा खोटा; ट्रम्प यांनी वृत्त फेटाळले
होर्मुझजवळ अमेरिकेचे युद्ध हेलिकॉप्टर कोसळले
अमेरिकेतील न्यू मेक्सिको न्यायालयाने सोशल मीडिया कंपनी मेटाला मोठा दणका दिला. न्यायालयाने इंस्टाग्राम आणि फेसबुकमुळे तरुणांवर झालेल्या ...

अमेरिकेतील न्यू मेक्सिको न्यायालयाने फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटाला तब्बल 942 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.मेटाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे तरुणांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला, तसेच मुलांच्या सुरक्षेबाबत कंपनीने पुरेशी काळजी घेतली नाही, असा न्यायालयाचा निष्कर्ष आहे.या दंडातील सुमारे 420 दशलक्ष डॉलर्स तरुणांच्या उपचारांसाठी खर्च केले जाणार आहेत. उर्वरित रक्कम जनजागृती, प्रतिबंध आणि तपासणी सेवांसाठी वापरली जाणार आहे.मेटावर प्लॅटफॉर्मच्या व्यसनाधीन करणाऱ्या फीचर्स, वय पडताळणी आणि मुलांच्या गोपनीयतेबाबतही गंभीर आरोप करण्यात आले. मुलांना ऑनलाइन जाळ्यात ओढून त्यांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांबाबत कंपनीला माहिती असूनही पुरेशी कारवाई केली नाही, असाही आरोप आहे.हा खटला न्यू मेक्सिकोचे ॲटर्नी जनरल राऊल टॉरेस यांनी दाखल केला होता. मेटाने मात्र न्यायालयाचा निर्णय मान्य करण्यास नकार दिला असून या निर्णयाविरोधात अपील करण्याची तयारी दर्शवली आहे.या निर्णयामुळे मेटावर भविष्यात आणखी कायदेशीर आणि नियामक दबाव वाढण्याची शक्यता आहे.

COMMENTS