Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोनई आरोग्य केंद्रात ‘आरोग्य अधिकारी’ द्या; नागरिकांची मागणी ; रुग्णांची हेळसांड

सोनई : सोनई (ता. नेवासा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात रुग्णांची गैरसोय होत आहे.

श्री अगस्ति ऋषी आश्रमात कीर्तन महोत्सव 
स्वच्छतागृहांसाठी सव्वाकोटींचा निधी मंजूर : नगराध्यक्ष संधान
पाथर्डी – गेवराई बस सेवा सुरू झाल्यामुळे नागरिकात उत्साह
मुख्यपृष्ठ | जिल्हा परिषद अहिल्यानगर | भारत

सोनई : सोनई (ता. नेवासा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात रुग्णांची गैरसोय होत आहे. सोनई आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते यांची जिल्हा क्षयरोग अधिकारी पदी बदली झाल्याने सोनई आरोग्य केंद्रात त्यांच्या जागी अजून कोणी अधिकारी बदलून आला नसल्याने सोनई व १२ वाड्या परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. यामुळे सोनई आरोग्य केंद्रात तातडीने मुख्य आरोग्य अधिकारी यांचे पद भरावे अशी मागणी सोनईतील ग्रामस्थांनी केली आहे.

 सोनई आरोग्य केंद्रात एकूण तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असताना सध्या केवळ एकच आरोग्य अधिकारी कार्यरत असल्याने उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.तसेच जास्त रुग्ण असल्याने प्रतीक्षा करावी करावी लागत आहे.सोनईसह बारा वाडया व  परिसरातील अनेक गावांतील नागरिक या आरोग्य केंद्रावर उपचारासाठी अवलंबून आहेत. मात्र अपुऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांमुळे वेळेवर तपासणी, उपचार व आपत्कालीन सेवा देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने आणखी दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली आहे. सोनई परिसरातील आरोग्य सेवा सुरळीत व प्रभावीपणे चालण्यासाठी रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.“आरोग्य केंद्रात अधिकारी अपुरे असल्याने रुग्णांची गैरसोय वाढत आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित नियुक्ती करावी,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सोनई गावातील नागरिक उपचारासाठी या आरोग्य केंद्रावर अवलंबून आहेत. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण येथे येत असतात. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे तपासणी, औषधोपचार तसेच आपत्कालीन सेवांवर परिणाम होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.रुग्णसंख्या वाढत असताना केवळ एकाच आरोग्य अधिकाऱ्यावर सोनई आरोग्य केंद्राची संपूर्ण जबाबदारी असल्याने आरोग्य सेवा विस्कळीत होत असल्याने तातडीने रिक्त असलेल्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रशासनाने करावी.

 -गणेश बाबासाहेब साळवे, सामाजिक कार्यकर्ते, सोनई

COMMENTS