Homeताज्या बातम्या

मक्का संरक्षण करार; भारतासाठी किती डोकेदुखी?

पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्कीने ‘मक्का संयुक्त संरक्षण करारा’वर स्वाक्षरी केली आहे. या करारानुसार, एका देशावर हल्ला झाल्यास तो तिन्ही देशांव

आजोबांचा आपल्या 13 वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार I LOKNews24
परिणीती चोप्रानंतर आता कंगना रनौत अडकणार विवाह बंधनात ?
जुने संसद भवन बनले संविधान सदन
Mecca Joint Defence Agreement: सौदी, पाक अन् तुर्कियेमध्ये 'मक्का संयुक्त  संरक्षण करार'; एका देशावर हल्ला झाल्यास तिन्ही देश एकत्र भिडणार

पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्कीने ‘मक्का संयुक्त संरक्षण करारा’वर स्वाक्षरी केली आहे. या करारानुसार, एका देशावर हल्ला झाल्यास तो तिन्ही देशांवरील हल्ला मानला जाऊ शकतो.या करारामुळे तिन्ही देशांमध्ये संयुक्त लष्करी प्रशिक्षण, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि सुरक्षा सहकार्य वाढणार आहे. पाकिस्तानची लष्करी ताकद, सौदीची आर्थिक क्षमता आणि तुर्कीचं ड्रोन तंत्रज्ञान यामुळे या आघाडीची ताकद वाढू शकते.भारतासाठी चिंता अशी की, पाकिस्तानला सौदी आणि तुर्कीकडून अधिक रणनीतिक पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. मात्र हा करार प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी तिन्ही देशांना एकमेकांसाठी लढण्यास भाग पाडतो का, हे अद्याप स्पष्ट नाही.त्यामुळे हा करार भारतासाठी नक्कीच रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा, पण लगेच मोठा धोका ठरतो असं म्हणणं घाईचं ठरेल.

COMMENTS