अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आपल्या स्पष्ट आणि परखड कार्यशैलीसाठी ओळखले जातात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नेतृत्वाखाली
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आपल्या स्पष्ट आणि परखड कार्यशैलीसाठी ओळखले जातात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नेतृत्वाखाली FDAकडून अस्वच्छता, भेसळ आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स आणि खाद्य आस्थापनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे.दरम्यान, पुण्यात झालेल्या एका प्रकट मुलाखतीत तुकाराम मुंढे यांनी आपल्या आयुष्यातील अनेक रंजक आठवणी सांगितल्या. यावेळी पुण्यात पहिल्यांदा चायनीज फूड कुठे खाल्लं, याचाही किस्सा त्यांनी सांगितला.मुंढे म्हणाले की, पुण्यात असताना बापट रोड किंवा पाषाण रोड परिसरात चायनीजच्या गाड्या असायच्या. आपण पहिल्यांदा चायनीज फूड तिथेच खाल्लं होतं. त्यावेळी चायनीज फूड म्हणजे नेमकं काय, याचीही फारशी माहिती नव्हती, असं त्यांनी सांगितलं.मात्र, याचवेळी त्यांनी सध्याच्या FDA कारवाईबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं. गेल्या काही दिवसांत झालेल्या कारवायांनंतर आता चायनीज खाद्यपदार्थ विकणाऱ्या ठिकाणांकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे, असं मुंढे यांनी सांगितलं. त्यामुळे चायनीज फूड सेंटरचीही तपासणी करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.आता हॉटेल्स, ढाबे आणि इतर खाद्य आस्थापनांनंतर FDAचा मोर्चा चायनीज सेंटरकडे वळणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.जर चायनीज सेंटरमध्येही स्वच्छता, खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि अन्न सुरक्षा नियमांची तपासणी सुरू झाली, तर अनेक आस्थापनांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुकाराम मुंढेंच्या या वक्तव्यानंतर FDAचं पुढचं टार्गेट नेमकं कोणतं, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS