मुंबईकरांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, 10 ऑगस्ट 2026 पासून मुंबई मे

मुंबईकरांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, 10 ऑगस्ट 2026 पासून मुंबई मेट्रो वनवर ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू होणार आहे.या नव्या व्यवस्थेमुळे अंधेरी ते घाटकोपरदरम्यान गर्दीच्या वेळेत मेट्रोचं अंतर 3 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. सध्या हे अंतर 3 मिनिटे 20 सेकंद आहे.मिक्स्ड-लूप सेवेमध्ये एक ट्रेन घाटकोपर-अंधेरीदरम्यान शॉर्ट लूपवर धावेल, तर त्यानंतरची ट्रेन घाटकोपर ते वर्सोवा अशी पूर्ण फेरी करणार आहे.यामुळे मेट्रोची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता 20 टक्क्यांहून अधिक वाढणार असून, तब्बल 28 हजार अतिरिक्त प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. आठवड्याच्या कामकाजाच्या दिवसांतील एकूण ट्रेन फेऱ्याही 476 वरून 484 करण्यात येणार आहेत.या बदलामुळे प्रतीक्षा वेळ कमी होणार असून, अंधेरी-घाटकोपरदरम्यान प्रवास करणाऱ्या 85 टक्क्यांहून अधिक प्रवाशांना थेट फायदा होण्याची अपेक्षा आहे.म्हणजेच, मुंबईकरांचा मेट्रो प्रवास आता अधिक जलद, सोयीस्कर आणि गर्दीच्या वेळेत अधिक विश्वासार्ह होणार आहे.

COMMENTS