Homeताज्या बातम्या

नवगण महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

परळी वैजनाथ: नवगण शिक्षण संस्था संचलित, नवगण महाविद्यालय, परळी वैजनाथ येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभ

आंदोलनकर्त्यांच्या घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी राष्ट्रपतींना निवेदन : सोमनाथ मोहिते
आसाममध्ये ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के; कचार जिल्ह्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
जमिनीच्या वर्ग-१ नोंदीसाठी उपोषणाचा इशारा; शेवगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाची घोषणा

परळी वैजनाथ: नवगण शिक्षण संस्था संचलित, नवगण महाविद्यालय, परळी वैजनाथ येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आबासाहेब हांगे होते. यावेळी उपस्थितांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आबासाहेब हांगे यांनी लोकमान्य टिळक यांच्यातील प्रखर राष्ट्रप्रेम आणि स्वातंत्र्यलढ्यातील अतुलनीय योगदानाचा आढावा घेतला. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या साहित्याची परंपरा आजच्या पिढीला निरंतर प्रेरणा देणारी असल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी या महापुरुषांचे उदात्त विचार आत्मसात करून समाजहितासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बबन झांजे यांनी केले, तर सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कार्यक्रम अधिकारी डॉ. बबन मोहिते यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप डॉ. चांगदेव शेळके यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाला.

COMMENTS