Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘पाणी कपातीसह बचतीचे उपाय करण्याची गरज’ 

श्रीरामपूर : यंदा एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत हा प्रभाव राहणार असल्याने पावसाळा लांबण्याची शक्यता असून, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. श्रीरामपूर शहरासह बेलापूर-ऐनतपूर, निपाणीवाडगाव, लोणी, कोल्हार आदी मोठ्या गावांचा पाणीपुरवठा कालव्यावर अवलंबून आहे. या सर्व गावांची लोकसंख्या मोठी असल्याने पावसाळा उशिरा येण्याची शक्यता लक्षात घेता मे महिन्यापासूनच पाणी कपात आणि पाणी बचतीचे उपाय अवलंबणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अंगण, रस्ते किंवा वाहने धुण्यासाठी पाणी वापरणे हे अयोग्य व बेजबाबदारपणाचे असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. संभाव्य पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने व काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बेलापूर-वळदगांव रस्त्याची दुरवस्था;अवजड वाहनांनमुळे रास्ता खराब; नागरिकांकडून कारवाईची मागणी
बारामती, राहुरीत प्रचाराची सांगता; अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी : सुनेत्रा पवार
बसस्थानक उभारणीत नागरिकांच्या गरजांकडे दुर्लक्ष; आ. आशुतोष काळे ; काँक्रिटीकरण कामास प्रारंभ 
kolhapur water supply | 161 कोटींच्या थकीत बिलासाठी मनपाचा पाणीपुरवठा होणार  बंद

श्रीरामपूर : यंदा एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत हा प्रभाव राहणार असल्याने पावसाळा लांबण्याची शक्यता असून, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरासह बेलापूर-ऐनतपूर, निपाणीवाडगाव, लोणी, कोल्हार आदी मोठ्या गावांचा पाणीपुरवठा कालव्यावर अवलंबून आहे. या सर्व गावांची लोकसंख्या मोठी असल्याने पावसाळा उशिरा येण्याची शक्यता लक्षात घेता मे महिन्यापासूनच पाणी कपात आणि पाणी बचतीचे उपाय अवलंबणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अंगण, रस्ते किंवा वाहने धुण्यासाठी पाणी वापरणे हे अयोग्य व बेजबाबदारपणाचे असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

संभाव्य पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने व काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

COMMENTS