Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत नगरपंचायतीतील गटनेते बदल प्रकरणाची सुनावणी ५ मे रोजी

कर्जत : कर्जत नगरपंचायत गटनेता बदल करण्याबाबतची सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी पार पडली. यामध्ये दोन्हीही गटांकडून विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. यामध्ये गटनेते संतोष मेहत्रे यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी आम्हाला कागदपत्रांचा व इतर अभ्यास करण्यासाठी मुदत देण्यात यावी अशी मागणी केली होती; त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणावर आता पाच मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सुनावणी होईल असे सांगितले. कर्जत येथील उपनेते सतीश पाटील यांनी गटनेते संतोष मेहत्रे यांच्यावर घटनेप्रमाणे काम करत नसल्यामुळे नगरसेवकांची विशेष सभा बोलून त्यांना या पदावरून दूर करावे अशी मागणी केली होती.  त्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी नऊ नगरसेवकांनी गटनेते संतोष मेहत्रे यांच्या विरोधात दाखल केलेल्या प्रस्तावावर सह्या केल्या व नवीन घटनेचा निवडण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. तर उपनगराध्यक्ष व गटनेते संतोष मेहत्रे यांनी उपनेते सतीश पाटील यांना घटनेने अशा पद्धतीचे सभा बोलवण्याचा नैतिक अधिकार नाही. उलट त्यांनाच पदावरून दूर केल्याची जाहीर करत सर्व 14 नगरसेवकांना उपनेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहू नये अशा पद्धतीची नोटीस बजावली होती. या दोन्हीही मुद्द्यांवर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सुनावणी झाली.   या दोन्ही बाजूंचे युक्तिवाद जिल्हाधिकारी कार्यालयात मांडण्यात आले. उपनेते सतीश पाटील यांच्या वतीने उपस्थित वकिलांनी बहुमताच्या आधारे गटनेते मेहत्रे यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत तात्काळ कारवाईची मागणी केली. तसेच बहुमताच्या आधारे विशेष सभा घेण्याचा अधिकार असल्याचे नमूद करत संबंधित पुरावे सादर करण्यात आले.  तर संतोष मेहत्रे यांच्या वतीने उपस्थित वकिलांनी नऊ नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा निर्णय घेतल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यावर विचार व्हावा, तसेच अधिक कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली.  या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संतोष मेहत्रे यांना पुरावे सादर करण्यासाठी ५ मेपर्यंत मुदत दिली असून, त्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे गटनेते पदाबाबत अंतिम निर्णय काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बहुमताने गटनेते संतोष मेहत्रे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे. 15 पैकी 11 नगरसेवक हे आमच्या सोबत असल्यामुळे संतोष मेहत्रे यांना या पदावरून दूर करावी अशी मागणी आम्ही केली होती. सर्व पुरावे जिल्हाधिकारी यांना सादर केले आहेत याप्रकरणी पाच तारखेला निश्चित आमच्या बाजूने निकाल लागेल असा विश्वास वाटतो. – सतीश पाटील, उपनेते. उपनेत्यांना सभा बोलवण्याचा घटनेने अधिकार नाही.  आम्ही नऊ नगरसेवकांना डिस्क्वालीफाईड करावी अशी नोटीस बजावली आहे त्यावर निर्णय व्हावा अशी मागणी केली आहे. याबाबत पाच तारखेला निश्चित आमच्या बाजूने जिल्हाधिकारी निकाल देतील. – संतोष मेहत्रे, गटनेते तथा उपनगराध्यक्ष

समाजात परस्पर सन्मान वाढल्यास धर्मांतर कमी होतील : रामगिरी महाराज; देवळाली प्रवरा येथे विराट हिंदू संमेलन
शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरवर ‘महसूल’ची कारवाईशेवगावात नाराजगी ; अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप
केशरबाई कापसे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन 
Karjat Nagarpanchayat in Karjat Ahmednagar,Ahmednagar - Best Government  Organisations near me in Ahmednagar - Justdial

कर्जत : कर्जत नगरपंचायत गटनेता बदल करण्याबाबतची सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी पार पडली. यामध्ये दोन्हीही गटांकडून विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. यामध्ये गटनेते संतोष मेहत्रे यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी आम्हाला कागदपत्रांचा व इतर अभ्यास करण्यासाठी मुदत देण्यात यावी अशी मागणी केली होती; त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणावर आता पाच मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सुनावणी होईल असे सांगितले.

कर्जत येथील उपनेते सतीश पाटील यांनी गटनेते संतोष मेहत्रे यांच्यावर घटनेप्रमाणे काम करत नसल्यामुळे नगरसेवकांची विशेष सभा बोलून त्यांना या पदावरून दूर करावे अशी मागणी केली होती.  त्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी नऊ नगरसेवकांनी गटनेते संतोष मेहत्रे यांच्या विरोधात दाखल केलेल्या प्रस्तावावर सह्या केल्या व नवीन घटनेचा निवडण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती.

तर उपनगराध्यक्ष व गटनेते संतोष मेहत्रे यांनी उपनेते सतीश पाटील यांना घटनेने अशा पद्धतीचे सभा बोलवण्याचा नैतिक अधिकार नाही. उलट त्यांनाच पदावरून दूर केल्याची जाहीर करत सर्व 14 नगरसेवकांना उपनेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहू नये अशा पद्धतीची नोटीस बजावली होती. या दोन्हीही मुद्द्यांवर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सुनावणी झाली.

  या दोन्ही बाजूंचे युक्तिवाद जिल्हाधिकारी कार्यालयात मांडण्यात आले. उपनेते सतीश पाटील यांच्या वतीने उपस्थित वकिलांनी बहुमताच्या आधारे गटनेते मेहत्रे यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत तात्काळ कारवाईची मागणी केली. तसेच बहुमताच्या आधारे विशेष सभा घेण्याचा अधिकार असल्याचे नमूद करत संबंधित पुरावे सादर करण्यात आले.

 तर संतोष मेहत्रे यांच्या वतीने उपस्थित वकिलांनी नऊ नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा निर्णय घेतल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यावर विचार व्हावा, तसेच अधिक कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली.

 या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संतोष मेहत्रे यांना पुरावे सादर करण्यासाठी ५ मेपर्यंत मुदत दिली असून, त्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे गटनेते पदाबाबत अंतिम निर्णय काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बहुमताने गटनेते संतोष मेहत्रे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे. 15 पैकी 11 नगरसेवक हे आमच्या सोबत असल्यामुळे संतोष मेहत्रे यांना या पदावरून दूर करावी अशी मागणी आम्ही केली होती. सर्व पुरावे जिल्हाधिकारी यांना सादर केले आहेत याप्रकरणी पाच तारखेला निश्चित आमच्या बाजूने निकाल लागेल असा विश्वास वाटतो. – सतीश पाटील, उपनेते.

उपनेत्यांना सभा बोलवण्याचा घटनेने अधिकार नाही. 

आम्ही नऊ नगरसेवकांना डिस्क्वालीफाईड करावी अशी नोटीस बजावली आहे त्यावर निर्णय व्हावा अशी मागणी केली आहे. याबाबत पाच तारखेला निश्चित आमच्या बाजूने जिल्हाधिकारी निकाल देतील. – संतोष मेहत्रे, गटनेते तथा उपनगराध्यक्ष

COMMENTS