शेवगाव : वंचित बहुजन आघाडी आणि समविचारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि २९) पोलीस स्टेशनवर मोर्चाने जाऊन ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड तसेच बागेश्वर महाराज यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध करण्यात आला. उपस्थितांनी घोषणाबाजी करत संबंधितांविरोधात कारवाईची मागणी केली. या मोर्चात प्रा किसन चव्हाण यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातील विविध मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. शिवाजी महाराजांचे लोकाभिमुख राज्यकारभार, रयतेप्रती कणव, शेतकरी व सामान्य जनतेशी असलेली बांधिलकी, व्यापार-उद्योग संरक्षण, गुलाम व्यापारास बंदी, धार्मिक सहिष्णुता, मुस्लीम सरदारांचा सहभाग, स्त्रियांच्या सन्मानाचे धोरण, तसेच इतिहासातील विविध संदर्भांवर त्यांनी मुद्देसूद विवेचन केले. यावेळी बोलताना त्यांनी आमदार संजय गायकवाड यांनी राजीनामा द्यावा तसेच बागेश्वर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. “शिवाजी महाराजांबद्दल कुणीही अपशब्द काढले तर आम्ही गप्प बसणार नाही. अठरापगड, अलुतेदार-बलुतेदार, भटके, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम यांचे राजे म्हणून शिवाजी महाराज सर्वसमावेशक आहेत,” असे ते म्हणाले. यावेळी शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना शिवाजी कोण होता हे पुस्तक भेट देण्यात आले भारतीय काम्युनिष्ठ पार्टीचे राज्य सचिव कॉ सुभाष लांडे वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख, अरुण झांबरे यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी कल्याण भागवत, ऑगस्टीन गजभिव, बबनराव पवार, प्रमोद गजभिव ,सुरेश खंडागळे ,रामा खंडागळे ,सलीम जिलानी, रवींद्र निळ, भीमा गायकवाड, लुकस गजभिव, गोरख तुपविहिरे, रज्जाक शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

शेवगाव : वंचित बहुजन आघाडी आणि समविचारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि २९) पोलीस स्टेशनवर मोर्चाने जाऊन ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड तसेच बागेश्वर महाराज यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध करण्यात आला. उपस्थितांनी घोषणाबाजी करत संबंधितांविरोधात कारवाईची मागणी केली.
या मोर्चात प्रा किसन चव्हाण यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातील विविध मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. शिवाजी महाराजांचे लोकाभिमुख राज्यकारभार, रयतेप्रती कणव, शेतकरी व सामान्य जनतेशी असलेली बांधिलकी, व्यापार-उद्योग संरक्षण, गुलाम व्यापारास बंदी, धार्मिक सहिष्णुता, मुस्लीम सरदारांचा सहभाग, स्त्रियांच्या सन्मानाचे धोरण, तसेच इतिहासातील विविध संदर्भांवर त्यांनी मुद्देसूद विवेचन केले.
यावेळी बोलताना त्यांनी आमदार संजय गायकवाड यांनी राजीनामा द्यावा तसेच बागेश्वर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. “शिवाजी महाराजांबद्दल कुणीही अपशब्द काढले तर आम्ही गप्प बसणार नाही. अठरापगड, अलुतेदार-बलुतेदार, भटके, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम यांचे राजे म्हणून शिवाजी महाराज सर्वसमावेशक आहेत,” असे ते म्हणाले. यावेळी शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना शिवाजी कोण होता हे पुस्तक भेट देण्यात आले
भारतीय काम्युनिष्ठ पार्टीचे राज्य सचिव कॉ सुभाष लांडे वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख, अरुण झांबरे यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी कल्याण भागवत, ऑगस्टीन गजभिव, बबनराव पवार, प्रमोद गजभिव ,सुरेश खंडागळे ,रामा खंडागळे ,सलीम जिलानी, रवींद्र निळ, भीमा गायकवाड, लुकस गजभिव, गोरख तुपविहिरे, रज्जाक शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

COMMENTS