जामखेड : तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथे लाठ्या, लोखंडी गज व लाथाबुक्यांनी करण्यात आलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी खर्डा पोलिसांनी २४ तासांत मुख्य आरोपीला अटक केली असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता ही घटना घडली. पिंपळगाव उंडा येथील शेतकरी मुरलीधर दगडू मोहळकर (वय ७०) व त्यांचा मुलगा विष्णू मोहळकर यांना आरोपी रविंद्र अर्जुन शिंदे, कृष्णा रविंद्र शिंदे, समर्थ राजेंद्र शिंदे व सुवर्णा रविंद्र शिंदे (सर्व रा. पिंपळगाव उंडा) यांनी लाठ्या, लोखंडी गज व लाथाबुक्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात मुरलीधर मोहळकर यांना डोक्यात, छातीत व पाठीवर गंभीर मार लागला. त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान दि. १५ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३.१५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विष्णू मोहळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी घरासमोर येऊन वाद घालत शिवीगाळ व धमक्या दिल्या. त्यानंतर लाकडी काठ्यांनी विष्णू व त्यांच्या मुलाला मारहाण केली, तर मुरलीधर मोहळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. प्रारंभी १३ एप्रिल रोजी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र मुरलीधर मोहळकर यांच्या मृत्यूनंतर गुन्ह्यात हत्येचे कलम वाढविण्यात आले. वरिष्ठांच्या आदेशानुसार खर्डा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रईस सय्यद, पोहेकॉ संभाजी शेंडे, गोकुळ इंगवले, पोलीस कॉन्स्टेबल शशी म्हस्के, राहुल शिंदे, गणेश बडे यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. यात रविंद्र शिंदे याला २४ तासांत अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

जामखेड : तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथे लाठ्या, लोखंडी गज व लाथाबुक्यांनी करण्यात आलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी खर्डा पोलिसांनी २४ तासांत मुख्य आरोपीला अटक केली असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे.
दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता ही घटना घडली. पिंपळगाव उंडा येथील शेतकरी मुरलीधर दगडू मोहळकर (वय ७०) व त्यांचा मुलगा विष्णू मोहळकर यांना आरोपी रविंद्र अर्जुन शिंदे, कृष्णा रविंद्र शिंदे, समर्थ राजेंद्र शिंदे व सुवर्णा रविंद्र शिंदे (सर्व रा. पिंपळगाव उंडा) यांनी लाठ्या, लोखंडी गज व लाथाबुक्यांनी मारहाण केली.
या हल्ल्यात मुरलीधर मोहळकर यांना डोक्यात, छातीत व पाठीवर गंभीर मार लागला. त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान दि. १५ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३.१५ वाजता त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विष्णू मोहळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी घरासमोर येऊन वाद घालत शिवीगाळ व धमक्या दिल्या. त्यानंतर लाकडी काठ्यांनी विष्णू व त्यांच्या मुलाला मारहाण केली, तर मुरलीधर मोहळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. प्रारंभी १३ एप्रिल रोजी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र मुरलीधर मोहळकर यांच्या मृत्यूनंतर गुन्ह्यात हत्येचे कलम वाढविण्यात आले.
वरिष्ठांच्या आदेशानुसार खर्डा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रईस सय्यद, पोहेकॉ संभाजी शेंडे, गोकुळ इंगवले, पोलीस कॉन्स्टेबल शशी म्हस्के, राहुल शिंदे, गणेश बडे यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. यात रविंद्र शिंदे याला २४ तासांत अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

COMMENTS