Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरआयटी डिप्लोमाला राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट किताब

इस्लामपूर / प्रतिनिधी : कासेगाव शिक्षण संस्थेच्या राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमा विभागातील मेकॅनिकल संघाला क्वालिटी सर्कल फो

राज्य उत्पादन शुल्क विभागाची तपास यंत्रणा सक्षम करणार : ना. शंभूराज देसाई
मुख्याधिकारी साबळे यांच्या विरोधात जोरदार निदर्शने
माजी सभापती आनंदराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर

इस्लामपूर / प्रतिनिधी : कासेगाव शिक्षण संस्थेच्या राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमा विभागातील मेकॅनिकल संघाला क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया आयोजित नॅशनल लेव्हल क्वालिटी कनव्हेंशनमध्ये उत्कृष्ट किताब मिळाला. क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया यांच्यातर्फे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेमध्ये देशभरातून जवळपास 2000 संघांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचे आयोजन पीएसजी आयटेक, कोईमतुर, तामिळनाडू येथे करण्यात आले होते.
क्वालिटी कॉन्सेप्ट या विषयावरील संशोधन मांडणीबाबत ही स्पर्धा होती. डिप्लोमा विभागातील प्रा. अक्षय कुलकर्णी, प्रा. स्वप्निल गायकवाड, प्रा. निलेश गायकवाड, प्रा. अन्सार मुल्ला, प्रा. स्वप्निल पाटील, प्रा. विनय चौधरी यांनी ऑनलाईन शिक्षण पध्दतीतील गणित मूलभूत विषयांवरील संशोधन सादर केले. त्यामध्ये त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणात येणार्‍या अडचणी व त्यावरील उपाय यांचा समावेश केला आहे. एनहांसमेंट ऑफ स्टूडेंट अप्रोच इन नॉलिटीकल कोर्सेस इन ऑनलाईन टीचींग हा त्यांच्या संशोधन सादरीकरणाचा मुख्य विषय होता. या संघाला राज्य स्तरावर गोल्ड किताब मिळाला होता.
संस्थेचे सचिव प्राचार्य आर. डी. सावंत, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य प्रा. शामराव पाटील, महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. सौ. सुषमा कुलकर्णी, डीन डिप्लोमा डॉ. एच. एस. जाधव, डीन डॉ. सचिन पाटील, बेस्ट अ‍ॅक्टिविटी उपक्रम प्रमुख प्रा. सौ. सविता पाटील यांनी सहभागी प्राध्यापकांचे अभिनंदन केले.

COMMENTS