Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रक्तरंजित सूडनाट्याने नांदेड हादरले; गँगवारमध्ये तिघांचा खून

नांदेड : नांदेड शहरात गँगवारने पुन्हा एकदा भयावह रूप धारण करत तिहेरी हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री आणि त्यानंतर काही तासांतच

मित्रात मतभेद झाल्याने पोलिस कर्मचार्‍याचा खून
कोपर खैरणेमध्ये धक्कादायक घटना समोर
विहिरीत नग्नावस्थेत आढळला मृतदेह 

नांदेड : नांदेड शहरात गँगवारने पुन्हा एकदा भयावह रूप धारण करत तिहेरी हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री आणि त्यानंतर काही तासांतच घडलेल्या सलग हल्ल्यांमध्ये तिघांचा निर्घृण खून करण्यात आला असून, शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. या रक्तरंजित संघर्षामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅनाल रोडवरील ई-स्क्वेअर परिसरात अरिजितसिंग गजानन चव्हाण (25) याच्यावर सय्यद आवेज, मोहंमद अरबाज आणि त्यांच्या साथीदारांनी धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अरिजितसिंगचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत सय्यद आवेज आणि अन्य एक जखमी झाले होते. मात्र, ही हिंसा इथेच थांबली नाही. आपल्या भावाच्या हत्येचा संताप मनात साठवून अरिजितसिंगचा भाऊ थेट विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात पोहोचला. उपचार सुरू असलेल्या सय्यद आवेज सय्यद खलील (27) यांच्यावर त्याने चाकूने हल्ला चढवला. या थरारक घटनेत दोघेही जागीच ठार झाले. भर रुग्णालयात घडलेल्या या हल्ल्याने सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल झाली आहे. प्राथमिक तपासात हा प्रकार दोन प्रतिस्पर्धी टोळ्यांमधील जुना वाद आणि वर्चस्वाच्या संघर्षातून घडल्याचे स्पष्ट होत आहे. ‘सदा गँग’ आणि ‘साई लाला गँग’ यांच्यातील तणाव मागील काही दिवसांपासून वाढत होता. शुक्रवारी रात्री ‘धुरंधर-2’ चित्रपट पाहून बाहेर पडताच अरिजितसिंगवर पाळत ठेवून हल्ला करण्यात आला, आणि त्यानंतर सूडाच्या ज्वालेतून रुग्णालयातही रक्तपात घडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार आणि अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक तपासाच्या आधारे पुढील कारवाई सुरू आहे. दरम्यान, कठोर कारवाईसाठी ओळख असलेल्या पोलिस यंत्रणेच्या उपस्थितीतच अशी तिहेरी हत्या घडल्याने प्रशासनावर संतापाची लाट उसळली आहे. नांदेड सुरक्षित आहे का? हा सवाल आता नागरिक थेट विचारत आहेत.


दोन्ही टोळ्यांची पाश्‍वर्र्भूमी गुन्हेगारी
दोन्ही टोळ्यांची गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याची चर्चा होत आहे. शुक्रवारी मध्यरात्री नंतर घडलेल्या या दोन गँगवारमध्ये एकाच वेळी तिघांचा खून झाला आहे. पोलीस दप्तरी या दोघांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. मयत अरिजीतसिंघ विरुद्ध तब्बल नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. साई लाला गँगचा अनिल पंजाबी हा एमपीडीए मध्ये तुरुंगात आहे. अरिजितसिंघ विरुद्ध हद्दपार एमपीडीएची कारवाई केली होती. साईलालाही नुकताच तुरुंगाबाहेर पडलेला आहे. एकूणच या प्रकरणातील दोन्ही गँगची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे. पोलीस दलाकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारावर नजर ठेवली जात असल्याची नेहमी सांगितले जाते असे असतानाही शुक्रवारी मध्यरात्री नंतरचे हे खुनी गँगवार दुर्लक्षित का राहिले? असा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

COMMENTS