Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भोंदू बाबाच्या जाळ्यात ‘हाय-प्रोफाईल’ भक्त?; गणेश शिंदेच्या अटकेनंतर राहुरीतील भक्त संपर्क क्षेत्राच्या बाहेर

देवळाली प्रवरा : बेलापूर बु. येथील कथित भोंदू बाबा गणेश माधवराव शिंदे याच्या अटकेनंतर आता प्रकरणाला नवा वळण मिळताना दिसत आहे. श्रीरामपूर शहर पोलि

भोंदूबाबा खरातचे ‘A’ कोडवर्डचे रहस्य उघड! १६० GB डेटामध्ये काय सापडलं? पाहा सविस्तर व्हिडिओ
जिम ट्रेनर बनला भोंदू बाबा; अंगात देवी येत असल्याचा बनाव करून लोकांकडून उकळले पैसे आणि महागडी दारू!
संगमनेरच्या दत्तधाम आश्रमची मोठी उपडेट; पोलिसांना दत्तधाम मधून औषधांचा साठा आणि २०० व्हिडिओस् जप्त

देवळाली प्रवरा : बेलापूर बु. येथील कथित भोंदू बाबा गणेश माधवराव शिंदे याच्या अटकेनंतर आता प्रकरणाला नवा वळण मिळताना दिसत आहे. श्रीरामपूर शहर पोलिसांच्या तपासात या बाबाकडे केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथिल व्यापारी, प्रतिष्ठित व काही राजकीय व्यक्तींचीही नियमित वर्दळ असल्याचे उघड होत आहे. विशेष म्हणजे, चौकशीत काही प्रभावशाली व्यक्तींची नावे समोर आल्यानंतर हे सर्वजण अचानक संपर्काबाहेर गेल्याने संशय अधिक गडद झाला आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरातील काही भक्तांनी मिळून या बाबासाठी बेलापूर येथे जागा खरेदी करून आलिशान बंगला उभारून दिला होता. या माध्यमातून बाबाच्या बंगल्यायासाठी मोठ्या प्रमाणात निधी उभारला गेला होता.बंगल्यासाठी निधी देणारे कोण? भक्तांना ‘विश्वासाच्या जाळ्या’तून अनेकांना आकर्षित करण्यात आले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, निवडणुकीपूर्वी काही इच्छुक उमेदवारांनीही या बाबाचा आशिर्वाद घेतल्याची चर्चा असून, त्यातून राजकीय कनेक्शनचीही चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे प्रकरण केवळ फसवणूक किंवा अंधश्रद्धेपुरते मर्यादित न राहता, प्रभावशाली नेटवर्कपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 या प्रकरणात एका महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात अत्याचार , फसवणूक व जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात सुमारे २० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक आणि श्रद्धेचा गैरफायदा घेत शारीरिक शोषण केल्याचे समोर आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून गुन्ह्याची कबुली मिळाली असून, त्याने अनेक ‘सहाय्यक’ व सुविधादारांची नावेही उघड केली आहेत. अटकेनंतर राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा भागातील काही संशयित भक्त अचानक बेपत्ता झाल्याने पोलिसांचे लक्ष आता त्यांच्या शोधाकडे वळले आहे. या सर्वांचा तपासात नेमका सहभाग काय होता, याचा शोध घेतला जात आहे.

 नाशिक व संगमनेरमधील तत्सम प्रकरणांनंतर या घटनेने जिल्ह्यात अंधश्रद्धा व भोंदूगिरीच्या वाढत्या जाळ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी अशा प्रकरणांपासून सावध राहण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, येत्या काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

COMMENTS