Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेअर बाजार फसवणूक प्ररकणी चौघांचा जामीन नाकारला 

शेवगाव :  तालुक्यातील शेअर बाजार गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील सहआरोपी जालिंदर बाळासाहेब काळे,शरद अंकुश काळे, राजेश एकनाथ काळे यांचा नियमित जामीन अर्ज व उमेश उर्फ बाल्या सुखदेव गायकवाड याचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी (दि. ६ मे) जिल्हा व सत्र न्यायालयाने नामंजूर केला.  शेवगाव येथील रहिवासी फिर्यादी अवधूत विनायक केदार यांनी मुख्य आरोपी साईनाथ कल्याण कवडे याच्याविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार आरोपीने स्वतःची “ऍसिटेक सोल्युशन्स”  ही शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी असल्याचे भासवून गुंतवणुकीवर १२ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले या आमिषाला बळी पडून फिर्यादी व इतर  गुंतवणूकदारांनी आरोपीकडे एकूण १ कोटी ६१ लाख ४२ हजार ९०० रुपयांची गुंतवणूक केली. मात्र आरोपीने ना अपेक्षित परतावा दिला ना गुंतवलेली मूळ रक्कम परत केली. त्यामुळे  २८ऑक्टोबर २०२४ रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली.   या प्रकरणात आरोपी व सह आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सहआरोपी जालिंदर काळे, शरद काळे व राजेश काळे यांनी नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जाला फिर्यादी अवधूत विनायक केदार यांनी उच्च न्यायालयातील नामांकित वकील ऍड. प्रशांत प्रभाकर गिरी यांच्यामार्फत तसेच सहआरोपी उमेश उर्फ बाल्या गायकवाड याने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता या अर्जाला फिर्यादी तर्फे ऍड. पंकज पद्माकर खराडे यांच्यामार्फत तीव्र विरोध केला.  विविध गोष्टी लक्षात घेता जालिंदर काळे,शरद काळे, राजेश काळे, व उमेश उर्फ बाल्या गायकवाड यांना जामीन देणे योग्य नसल्याचे सांगत त्यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले.  या प्रकरणात मूळ फिर्यादी अवधूत विनायक केदार यांच्यावतीने ऍड. प्रशांत प्रभाकर गिरी, ऍड.पंकज पद्माकर खराडे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली त्यांना ऍड. योगेश कासोद, ऍड.पवन जोंधळे, ऍड. तुषार जगताप यांनी याकामी मोलाचे सहकार्य केले.

जगन्नाथ म्हसे यांचे निधन
बातमीत इंग्रजी शब्द आहेत; संजीवनी इंजिनिअरिंगच्या आठ विद्यार्थ्यांना नोकरी 
कौडगावातील अनाधिकृत खनन तातडीने बंद कराग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा

शेवगाव :  तालुक्यातील शेअर बाजार गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील सहआरोपी जालिंदर बाळासाहेब काळे,शरद अंकुश काळे, राजेश एकनाथ काळे यांचा नियमित जामीन अर्ज व उमेश उर्फ बाल्या सुखदेव गायकवाड याचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी (दि. ६ मे) जिल्हा व सत्र न्यायालयाने नामंजूर केला.

 शेवगाव येथील रहिवासी फिर्यादी अवधूत विनायक केदार यांनी मुख्य आरोपी साईनाथ कल्याण कवडे याच्याविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार आरोपीने स्वतःची “ऍसिटेक सोल्युशन्स”  ही शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी असल्याचे भासवून गुंतवणुकीवर १२ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले या आमिषाला बळी पडून फिर्यादी व इतर  गुंतवणूकदारांनी आरोपीकडे एकूण १ कोटी ६१ लाख ४२ हजार ९०० रुपयांची गुंतवणूक केली. मात्र आरोपीने ना अपेक्षित परतावा दिला ना गुंतवलेली मूळ रक्कम परत केली. त्यामुळे  २८ऑक्टोबर २०२४ रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली.

  या प्रकरणात आरोपी व सह आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सहआरोपी जालिंदर काळे, शरद काळे व राजेश काळे यांनी नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जाला फिर्यादी अवधूत विनायक केदार यांनी उच्च न्यायालयातील नामांकित वकील ऍड. प्रशांत प्रभाकर गिरी यांच्यामार्फत तसेच सहआरोपी उमेश उर्फ बाल्या गायकवाड याने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता या अर्जाला फिर्यादी तर्फे ऍड. पंकज पद्माकर खराडे यांच्यामार्फत तीव्र विरोध केला.

 विविध गोष्टी लक्षात घेता जालिंदर काळे,शरद काळे, राजेश काळे, व उमेश उर्फ बाल्या गायकवाड यांना जामीन देणे योग्य नसल्याचे सांगत त्यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले.  या प्रकरणात मूळ फिर्यादी अवधूत विनायक केदार यांच्यावतीने ऍड. प्रशांत प्रभाकर गिरी, ऍड.पंकज पद्माकर खराडे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली त्यांना ऍड. योगेश कासोद, ऍड.पवन जोंधळे, ऍड. तुषार जगताप यांनी याकामी मोलाचे सहकार्य केले.

COMMENTS