Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजनंदिनी शिंदे ‘मी ज्ञानी होणार’ स्पर्धेत तिसरी

कोपरगाव शहर : न्यू इंग्लिश स्कूल येसगाव या विद्यालयाची इ.६ वी ची विद्यार्थिनी राजनंदिनी योगेश शिंदे हिने राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था, खोंद

कर्जत तालुक्यात बोगस ड्रायव्हिंग स्कूलचा सुळसुळाट; प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांची फसवणूक ; कारवाईची मागणी
कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. शिंदे यांचा सत्कार
पाच नंबर साठवण तलावाचे पाणी कुठे जाते? : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी सुनील गंगुले 

कोपरगाव शहर : न्यू इंग्लिश स्कूल येसगाव या विद्यालयाची इ.६ वी ची विद्यार्थिनी राजनंदिनी योगेश शिंदे हिने राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था, खोंदला (ता. कळंब जि. धाराशिव) आयोजित “मी ज्ञानी होणार” राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत १०० पैकी ९६ गुण मिळवून मोठ्या गटात राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत  तिसरा क्रमांक मिळवला. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ नुकताच न्यू इंग्लिश स्कूल येसगाव येथे पार पडला. या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून नुकत्याच राज्य सेवा परीक्षेतून वर्ग-१ (नवनियुक्त तालुका पुरवठा अधिकारी) पदावर नियुक्त झालेल्या उषा पवार  उपस्थित होत्या.
  राजनंदिनीच्या या यशाबद्दल न्यू इंग्लिश स्कूल, येसगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षिका, वर्गशिक्षिका तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी तिचे अभिनंदन केले आहे. या परीक्षेची तयारी करून घेण्यात विभाग प्रमुख धनवडे यांचा मोलाचा वाटा होता. राजनंदिनीचा नियमितपणे अभ्यास करून घेण्यात तिचे आजोबा प्रकाश शिंदे यांची मोलाची भूमिका असते. तिचे वडील प्रा.योगेश शिंदे हे सौ. सुशिलामाई काळे महाविद्यालय, गौतमनगर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून ते वायपी प्राध्यापक अमृततुल्य” या नावाजलेल्या व्यावसायिक ब्रँडचे संचालक म्हणूनही काम बघतात.

COMMENTS