Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

हाफिज सईदचा साथीदार आमीर हमजावर गोळीबार

लाहोर : पाकिस्तानच्या लाहोरमध्ये दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक सदस्य आणि हाफिज सईदचा जवळचा सहकारी आमीर हमजा याच्यावर अज्ञात हल्लेखोरां

शांतता करार हवेत विरला! २४ तासांत अमेरिकेचा इराणवर सलग दुसरा एअर स्ट्राईक; होर्मुजची सामुद्रधुनी युद्धाच्या छायेत। लोकमंथन News२४
एलपीजी ग्राहकांसाठी १ मे पासून नवे नियम! सिलिंडरसाठी OTP अनिवार्य; दरात वाढ आणि बुकिंगच्या नियमांतही मोठे बदल!
ट्रम्प यांचा यू टर्न; इराणसोबत करार करण्याचे संकेत
LeT Founder Amir Hamza Shot in lahore - Tarun Bharat

लाहोर : पाकिस्तानच्या लाहोरमध्ये दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक सदस्य आणि हाफिज सईदचा जवळचा सहकारी आमीर हमजा याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लाहोरमधील एका न्यूज चॅनलच्या कार्यालयाबाहेर हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हा हल्ला नेमका कोणी आणि कोणत्या कारणाने केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हाफिज सईदच्या नेतृत्वाखाली त्याने ‘लष्कर’ला इतर दहशतवादी गटांशी जोडण्याचे काम केले. तो लष्करशी संबंधित एका चॅरिटी संस्थेचे नेतृत्व करत होता आणि लष्करच्या युनिव्हर्सिटी ट्रस्टच्या बोर्डातही त्याचा समावेश होता. गेल्या वर्षभरातील आमीर हमजावर झालेला हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी गेल्या वर्षी त्याच्या घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार केला होता.

COMMENTS