Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागतिक अशांततेचा काळ शास्त्रज्ञांच्या जीवावर

गेल्या पाच वर्षात कोणता ना कोणता देश स्वत:च्या देशाच्या हितासाठी जगामधील शांतता भंग करत असल्याचे पहावयास मिळत आहे. जागतिक महामारीच्या काळात चीनने

काँगे्रससमोर पक्षफुटीचे आव्हान
राजकीय निवाडा..
निर्भयाची पुनरावृत्ती
The current image has no alternative text. The file name is: Agralekh.jpeg

गेल्या पाच वर्षात कोणता ना कोणता देश स्वत:च्या देशाच्या हितासाठी जगामधील शांतता भंग करत असल्याचे पहावयास मिळत आहे. जागतिक महामारीच्या काळात चीनने जगभरातील आरोग्य संस्थांच्या झोपा उडवून दिल्या होत्या. कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव ज्या शहरातून सुरुवात झाली त्यावेळीही जगभरातील नवीन संशोधनात्मक माहिती देणार्‍या सेमिनारला उपस्थित राहणारे तज्ञ अचानक संपर्कातून बाहेर पडल्याचे पहावयास मिळाले आहेत. नवनवीन संकल्पनांच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा विकास होत असतानाच्या काळात अचानक चीनमधील तज्ञांवर चीन सरकारने संपर्कात राहण्यास विरोध केला होता. त्यामुळे कोरोना विषाणूची रचना व निर्मितीबाबत जगभरातील शास्त्रज्ञांना काहीही माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे जगभरातील सामान्य नागरिक जिवाच्या आकांताने व वैद्यकिय क्षेत्रात सुरु असलेल्या व्यापारी करणाच्या बळी पडल्याचे पहावयास मिळाले. चीन सरकार शास्त्रज्ञांसारख्या महत्वपूर्ण व्यक्तींवर इतकी बंधने घालून त्यांना जेरीस आणते हे कोरोना महामारीच्या काळात भारतीय शास्त्रज्ञांनी सांगितले होते. त्या पाठोपा युक्रेन व रुस यांच्यातील युध्दामुळे भारतासह इतर देशातून वैद्यकिय शिक्षणाच्या निमित्ताने युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांनाही आपला जीव मुठीत घेऊन परतावे लागले होते. तसेच हे सर्व कशासाठी केले जात आहे, याचा सामान्य जनतेला काहीही देणे-घेणे नसते. मात्र, जागतिक पातळीवर होत असलेल्या घडामोडीचा थेट संबंध सामान्यांच्या जनजीवनावर असल्याचे भासवून लुट केली जात असल्याचे दिसून येत आहे.

अमेरिकेने इराणविरोधात युध्दाचा इशारा दिल्याबरोबरच दोन्ही देशातील नैसर्गिक साधन संपत्ती व सैन्याकडे असलेल्या तंत्रज्ञानाच्या चर्चा सुरु झाल्या. हे तंत्रज्ञान विकसित करण्यास कोणाचा हात आहे, याबाबतची माहिती समाज माध्यमामध्ये झळकू लागल्याने जगभरात अणु कार्यक्रमांशी निगडीत असलेल्या शास्त्रज्ञांच्या सुरेक्षेचा प्रश्‍न निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले आहे. सन 2023 पासून अमेरिकेतील 10 प्रख्यात शास्त्रज्ञ अचानक बेपत्ता झाल्याच्या घटनेमुळे देशात खळबळ उडाली आहे. यातील काही शास्त्रज्ञ रहस्यमयरित्या बेपत्ता झाले आहेत. तर काही जणांचा संशयास्पद शेवट झाला आहे. या शास्त्रज्ञांकडे देशाच्या अणु कार्यक्रमांची आणि अंतराळाशी संबंधित महत्त्वाची माहिती होती. त्यामुळे त्यांचे मृत्यू, त्यांचे बेपत्ता होणे अमेरिकेची चिंता वाढवणारे आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होणे टाळण्यासाठी व्हाईट हाऊसने याची गंभीर दखल घेतली आहे. आपल्या संबंधित यंत्रणांकडे याबद्दलचा सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे.

संरक्षण दलासाठी काम करणारे शास्त्रज्ञ एकाएकी बेपत्ता झाले. तसेच काही दिवसानंतर ते संशयास्पदरित्या मरण पावल्याचे सामोर आले आहे. हे शास्त्रज्ञ महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करत असल्याने अमेरिकेसारखा देश हतबल झाला आहे. या सर्व शास्त्रज्ञांचा अमेरिकेची सुरक्षा आणि गोपनीय शस्त्रांशी थेट संबंध होता. शास्त्रज्ञांसोबत घडत असलेले प्रकार पाहून यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 10 शास्त्रज्ञांसोबत घडलेल्या घटनांमागे काही समान धागा आहे का, अशी शंका जाणकारांनी वक्त केली आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या जीवावर नेमकं कोण उठलंय, त्यांना संपवण्याचे कट कोण रचतंय, असे सवाल उपस्थित केले जात आहेत. प्रशासन याकडे दुर्लक्ष करु शकत नाही. या सगळ्या बातम्यांच्या मुळाशी जाऊन तपास करण्यात येईल, असं व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लीविट यांनी सांगितलं. व्हाईट हाऊसकडून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकार पीटर डुसी यांनी थेट सवाल केल्यावर पूर्ण रहस्य उलगडलं. दरम्यान, चीन सरकारने इंटरनेट वापरणार्‍यांसाठी स्वत:ची वेगळी यंत्रणा तयार केली आहे. तसेच तेथील सर्व माध्यमे ही सरकारच्या मालकीची असल्याने सरकारला ज्या गोष्टी सोयीच्या आहेत, अशांच गोष्टींना प्रसिध्दी दिली जात असल्याने चीनच्या शास्त्रज्ञांच्या बाबत कोणतीही माहिती उपलब्ध होवू शकली नाही. चीन आणि अमेरिका ही दोन्ही राष्ट्रे बलाढ्य आहेत. चीनने कोरोना काळात केलेल्या उपचाराच्या बाबत कोणतीही माहिती जगाला दिली नाही. मात्र, उर्वरित जगामध्ये होत असलेल्या उपचार व संशोधनाबाबत सर्वत्र विचार विमर्श केला जात होता. अमेरिकेने पत्रकार परिषद घेऊन अचानक शास्त्रज्ञ बेपत्ता होण्याच्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. हाच दोन्ही देशांच्या विचारधारेतील फरक जाणवत आहे. कोणत्याही विषयाचे संशोधन करून ते देशहितासाठी उपयोगात आणणार्‍यांच्या जिवावर उठणार्‍यांची पाळेमुळे खोदून काढण्याचा अमेरिकेचा मानस दिसून येत आहे.

COMMENTS