Homeताज्या बातम्यादेश

प्रसिद्ध अभिनेता विजय राघवेंद्रच्या पत्नीचं निधन

झगमगत्या विश्वात गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक घटना घडत आहेत. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अनेक दिग्गज व्यक्तींच्या निधनानंतर दाक्षिणात्य

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालय दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
 शितलकुमार गोरे  समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
मनपाकडून कधी व्हायचे 213 कोटी वसुल…?थकबाकी दुर्लक्षित, पण नव्याने घरपट्टी वाढीवर मात्र प्रशासनाचा जोर

झगमगत्या विश्वात गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक घटना घडत आहेत. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अनेक दिग्गज व्यक्तींच्या निधनानंतर दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता विजय राघवेंद्र याची पत्नी स्पंदना राघवेंद्र हिचं निधन झालं आहे. स्पंदना राघवेंद्र हिच्या निधनानंतर अभिनेत्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्पंदना राघवेंद्र हिचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, स्पंदना राघवेंद्र हिला ब्लड प्रेशरचा त्रास होता. म्हणून अभिनेत्याच्या पत्नीला हृदयविकाराचा झटका आला आणि स्पंदना राघवेंद्र हिचं निधन झालं… अशी माहिती समोर येत आहे .मिळालेल्या माहितीनुसार, विजय राघवेंद्र याच्या पत्नीला लो ब्लड प्रेशरचा त्रास होता. त्यामुळे स्पंदना राघवेंद्र हिला हृदयविकाराचा झटका आला. स्पंदना राघवेंद्र हिचं पार्थिव उद्या बेंगळुरूला पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जेथे अभिनेत्याच्या पत्नी अंत्यसंस्कार होतील… धक्कादायक गोष्ट म्हणजे, कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत असताना स्पंदना राघवेंद्र हिचं निधन झालं आहे. बँकॉकमध्ये स्पंदना राघवेंद्र हिचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. परदेशात निधन झाल्यामुळे भारतात पार्थिव येण्यास वेळ लागत आहे. मंगळवारी अभिनेत्याच्या पत्नीचं पार्थिव बेंगळुरूला पोहोचेल असं सांगण्यात येत आहे. स्पंदना हिच्या आकस्मिक निधनामुळे अभिनेत्रीच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

COMMENTS