Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिली. प्रस्तावित 8 व्या वेतन आ

नळ पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवा; पालकमंत्री विखेंचे निर्देश, नियमित वेतन व सुविधा देण्याच्या सूचना ; संप मागे
निवृत्तांच्या प्रश्नांसाठी संघटीत होणे गरजेचे : पोकळे; राहाता येथे कृतिशील निवृत्त अधिकारी-कर्मचारी संघटनेची बैठक उत्साहात
नांदेड महापालिका कर्मचार्‍यांचा 47 महिन्यांपासून महागाई भत्ता थकीत; चार वर्षांपासून भत्ता न मिळाल्याने थकबाकी 6 कोटींवर; प्रशासनाच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह
DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांची बल्ले-बल्ले! महागाई भत्त्यात मोठी वाढ, पगार  भरभक्कम वाढणार, कधीपासून...

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिली. प्रस्तावित 8 व्या वेतन आयोगांतर्गत वेतन रचनेत मोठे बदल करण्याच्या कर्मचारी संघटनांच्या मागण्यांच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

नॅशनल कौन्सिल-जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीने सरकारला सादर केलेल्या निवेदनात वेतन रचनेत मोठे बदल करण्याची मागणी केली आहे. यात प्रामुख्याने 3.83 इतक्या उच्च ’फिटमेंट फॅक्टर’ची मागणी आहे. ज्यामुळे किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरून वाढून सुमारे 69,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकेल.

वेतन गणनेसाठी ’कुटुंब’ या संज्ञेची व्याप्ती वाढवून त्यात अवलंबून असलेल्या पालकांचा समावेश करण्याचा प्रस्तावही या संघटनेने मांडला आहे. तसेच वेतनातील तफावतीवर मर्यादा घालण्याची आणि त्यासोबतच उच्च वेतनवाढ व महागाईशी निगडित भत्ते देण्याची शिफारस केली आहे.

COMMENTS