श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी.फार्मसी कॉलेज, अंबाजोगाई आणि युनिरेवा हेल्थकेअर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अंतिम वर्षातील डी.फार्म

श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी.फार्मसी कॉलेज, अंबाजोगाई आणि युनिरेवा हेल्थकेअर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अंतिम वर्षातील डी.फार्मसी व बी.फार्मसी विद्यार्थ्यांसाठी भव्य कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नामांकित फार्मास्युटिकल कंपनीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
दिनांक 22 जून 2026 रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या वेळी संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी, व्यवस्थापकीय संचालक संकेत मोदी, सौ. डिंपल संकेत मोदी, मार्गदर्शक प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी, प्रा. वसंत चव्हाण, प्रा. राघवेंद्र राजमान्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष तरके उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. संतोष तरके यांनी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील बदलत्या संधींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. तसेच महाविद्यालयाचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग विद्यार्थ्यांच्या करिअर विकासासाठी सातत्याने कार्यरत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हची सुरुवात युनिरेवा हेल्थकेअरच्या प्रतिनिधींनी कंपनीची माहिती देणार्या सादरीकरणाने केली. पीपीटीच्या माध्यमातून कंपनीची पार्श्वभूमी, कार्यपद्धती, उपलब्ध पदे आणि करिअरच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांची तांत्रिक व बौद्धिक क्षमता तपासण्यासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या तांत्रिक (टेक्निकल) आणि मानव संसाधन (एचआर) विभागामार्फत मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये विद्यार्थ्यांचे विषयज्ञान, संवादकौशल्य आणि व्यावसायिक क्षमतेचे मूल्यमापन करण्यात आले. या प्लेसमेंट ड्राइव्हच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. नरेशकुमार जैस्वाल, प्रा. संभाजी गित्ते, प्रा. मंदार चौधरी तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी जोडणारे आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारे असे उपक्रम त्यांच्या व्यावसायिक विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असून भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आ

COMMENTS