Homeताज्या बातम्या

प्रश्न नागरिकांचा होता, जबाबदारी फाउंडेशनने घेतली; नगरसेवक मात्र कुठे?नमरा कॉलनीतील धोकादायक विजेच्या तारांचा प्रश्न अखेर निकाली; मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश

बीड शहरातील प्रभाग क्रमांक 23 मधील नमरा कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरांवरून जाणार्‍या धोकादायक विजेच्या तारांचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला

कॅन व कंटेनरमधून बेकायदेशीर इंधन विक्री; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न
बीड जिल्ह्यात 1773 रुग्णांना सुमारे 13.69 कोटीची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती
मुस्लिम आरक्षण मोर्चाला सशर्त पाठिंबा; संयोजकांनी भूमिका स्पष्ट करावी-अ‍ॅड.प्रा. इलियास इनामदार



बीड शहरातील प्रभाग क्रमांक 23 मधील नमरा कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरांवरून जाणार्‍या धोकादायक विजेच्या तारांचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या समस्येमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. घरांच्या अगदी जवळून जाणार्‍या विजेच्या तारांमुळे अपघाताची भीती निर्माण झाली होती. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.
नागरिकांनी वारंवार या समस्येकडे लक्ष वेधूनही प्रश्न सुटत नसल्याने मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनने पुढाकार घेतला. फाउंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी महावितरण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून महावितरणकडून आवश्यक कार्यवाही करण्यात आली. या अंतर्गत नागरिकांच्या घरांवरून जाणार्‍या विजेच्या तारा हटविण्यात आल्या असून नवीन विद्युत खांब बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत फाउंडेशनच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. या कामासाठी महावितरण बीड शहर उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. विक्रम चव्हाण साहेब, प्रभारी शाखा शहर क्रमांक 3 चे सहायक अभियंता श्री. अतुल बंडगर साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच कॉन्ट्रॅक्टर खय्यूम भाई यांनी प्रत्यक्ष काम पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली.  दरम्यान, नागरिकांचा मूलभूत प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित असताना तो सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित पाठपुरावा झाला नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. नागरिकांचा प्रश्न होता, जबाबदारी फाउंडेशनने घेतली; मग नगरसेवक कुठे होते? असा सवालही परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनच्या या पुढाकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला असून सामाजिक संस्थांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

COMMENTS