Homeताज्या बातम्या

बीडमध्ये तरूणाची चाकूने वार करत हत्या

बीड : बीडमध्ये शनिवारी मध्यरात्री तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. 21 वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करत जागीच संपवण्यात आले. अंबाजोगाई तालुक्

राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोरमान्सून अधिक सक्रिय होण्याचा हवामान विभागाचे अंदाज
अंटार्क्टिका ही मंत्रमुग्ध करणारी सफर आहे : डॉ.मधुबाला जोशी (चिंचाळकर)
वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालयाचे प्रा.डॉ.राजकुमार कांबळे यांचा सेवापूर्ती गौरव
लग्‍नातील भांडणात मध्यस्‍थी करायला गेलेल्‍या तरूणाची चाकूने वार करून हत्‍या


बीड : बीडमध्ये शनिवारी मध्यरात्री तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. 21 वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करत जागीच संपवण्यात आले. अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे किरकोळ वादातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर तरुणाच्या नातेवाईकांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी ठिया आंदोलन केले.ज्ञानेश्‍वर उत्तरेश्‍वर वाकडे (21 वर्षे) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव होते. तो पट्टीवडगाव येथे कुटुंबीयांसोबत राहत होता. ज्ञानेश्‍वर वाकडे हा गेल्या एक वर्षापासून लातूरजवळील हायवेवर एका ठिकाणी आचारी म्हणून काम करत होता.

COMMENTS