परळी वैजनाथ येथील युनिक क्युरियस किड्स शाळेत शैक्षणिक वर्ष 2026-27 ची सुरुवात शुक्रवार, दि. 12 जून रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. शाळेच्

परळी वैजनाथ येथील युनिक क्युरियस किड्स शाळेत शैक्षणिक वर्ष 2026-27 ची सुरुवात शुक्रवार, दि. 12 जून रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी फेरी इन द स्काय या आकर्षक संकल्पनेवर आधारित विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पूजा सचिन सारडा यांनी दिली.
या स्वागत सोहळ्यात मुलींनी सुंदर परींचे पोशाख परिधान केले होते, तर मुलांनी आकर्षक आणि पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवला. शाळेचा संपूर्ण परिसर परीविश्वाची अनुभूती देईल अशा पद्धतीने सजविण्यात आला होता. ढग, पंख, तारे आणि विविध आकर्षक सजावटींमुळे विद्यार्थ्यांना आपण परींसोबत आकाशात भरारी घेत असल्याचा आनंददायी अनुभव मिळाला. या उपक्रमामागील मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून स्वप्नांना पंख देत जीवनात उंच भरारी घेण्यासाठी प्रेरित करणे हा होता. चिमुकल्यांची उत्साहपूर्ण उपस्थिती, आनंदी वातावरण आणि कल्पक संकल्पना यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. विद्यार्थी आणि पालकांनी या आगळ्यावेगळ्या स्वागत सोहळ्याचे मनापासून कौतुक केले. आनंद, उत्साह आणि प्रेरणादायी वातावरणात युनिक क्युरियस किड्सच्या नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात संपन्न झाली.

COMMENTS