Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबाजोगाईत लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव – आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

अंबाजोगाई : शहरात एका 28 वर्षीय महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दोन वर्षांपासून शारीरिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्

मजुराच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; ४ लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास
न्यू व्हिजन पब्लिक स्कूलचे प्राचार्य पांडुरंग पाटील यांना इंग्रजी विषयातील शोध प्रबंधासाठी पीएचडीशैक्षणिक वर्तुळातून डॉ.पांडुरंग पाटील यांचे अभिनंदन
योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मेडिकल कॉलेज विभाग शाळेत श्री.व्यंकटेश चामनर सर यांची विभागप्रमुख पदावर नियुक्ती
ambajogai police station Archives | कार्यारंभ लाईव्ह

अंबाजोगाई : शहरात एका 28 वर्षीय महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दोन वर्षांपासून शारीरिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून सलमान अजीज पठाण याच्याविरुद्ध फसवणूक, अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळची लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील रहिवासी असलेल्या या महिलेने आरोप केला आहे की, आरोपीने सुरुवातीला विवाहाचे आश्वासन देत तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. मात्र नंतर विवाहासाठी धर्मांतर करण्याची अट घालत तिच्यावर दबाव आणण्यात आला तसेच शिवीगाळ व धमक्या देण्यात आल्या. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 69, 352 आणि 351(2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

COMMENTS