कोपरगाव : राज्य पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे अत्यंत गरजेचे असून ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेच्या माध्यमातून शाश्वत जलव्यवस्थापन अधिक बळकट होईल. ही जलयात्रा राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी नव्या जलक्रांतीची दिशा ठरणार आहे, असा विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला. जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधत २५ ते २९ एप्रिलदरम्यान हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. २६) कोपरगाव मतदारसंघातील कुंभारी येथे दक्षिणवाहिनी गोदावरी नदीचे विधिवत जलपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जलकुंभ पाटबंधारे विभागाचे उपअभियंता संदीप पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार काळे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या दूरदर्शी व लोकाभिमुख शासक होत्या. त्यांनी घाट, धर्मशाळा, तीर्थक्षेत्र विकास, जलसंवर्धन आणि लघु सिंचनाच्या माध्यमातून समाजहिताचे अनेक आदर्श प्रकल्प उभारले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन राबविण्यात येणारी ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा ही संकल्पना अत्यंत उपयुक्त असून जलसंवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात ती महत्त्वाची ठरेल. राज्यात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे झाली असून या जलयात्रेमुळे जलव्यवस्थापन अधिक प्रभावी, लोकाभिमुख आणि शाश्वत होण्यास मदत होईल. त्यामुळे महाराष्ट्र दुष्काळमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी प.पू. राघवेश्वरानंदगिरीजी महाराज, गोदावरी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता संदीप पाटील, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, संभाजीराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे, प्रशांत घुले, विष्णू शिंदे, रामदास केकाण, नानासाहेब चौधरी, वाल्मिकराव कोळपे, डॉ. आय. के. सय्यद आदींसह विविध पदाधिकारी, सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोपरगाव : राज्य पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे अत्यंत गरजेचे असून ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेच्या माध्यमातून शाश्वत जलव्यवस्थापन अधिक बळकट होईल. ही जलयात्रा राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी नव्या जलक्रांतीची दिशा ठरणार आहे, असा विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.
जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधत २५ ते २९ एप्रिलदरम्यान हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. २६) कोपरगाव मतदारसंघातील कुंभारी येथे दक्षिणवाहिनी गोदावरी नदीचे विधिवत जलपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जलकुंभ पाटबंधारे विभागाचे उपअभियंता संदीप पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार काळे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या दूरदर्शी व लोकाभिमुख शासक होत्या. त्यांनी घाट, धर्मशाळा, तीर्थक्षेत्र विकास, जलसंवर्धन आणि लघु सिंचनाच्या माध्यमातून समाजहिताचे अनेक आदर्श प्रकल्प उभारले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन राबविण्यात येणारी ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा ही संकल्पना अत्यंत उपयुक्त असून जलसंवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात ती महत्त्वाची ठरेल.
राज्यात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे झाली असून या जलयात्रेमुळे जलव्यवस्थापन अधिक प्रभावी, लोकाभिमुख आणि शाश्वत होण्यास मदत होईल. त्यामुळे महाराष्ट्र दुष्काळमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी प.पू. राघवेश्वरानंदगिरीजी महाराज, गोदावरी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता संदीप पाटील, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, संभाजीराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे, प्रशांत घुले, विष्णू शिंदे, रामदास केकाण, नानासाहेब चौधरी, वाल्मिकराव कोळपे, डॉ. आय. के. सय्यद आदींसह विविध पदाधिकारी, सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS