कर्जत : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघाच्या राज्य कार्यकारिणीमध्ये कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी कैलास आबासाहेब तरटे यांची राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे कर्जत तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्याच्या शासकीय व प्रशासकीय वर्तुळात आनंद व्यक्त केला जात आहे. सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात राज्य संघाचे अध्यक्ष टी. आर. पाटील, राज्य सरचिटणीस एस. डी. पाटील, राज्य उपाध्यक्ष सागर सरावणे, राज्य प्रसिद्धीप्रमुख नवनाथ गोरे तसेच जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत तरटे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेचे माजी व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक प्रशांत सातपुते, अकोले तालुका अध्यक्ष संतोष देशमुख, तसेच सातारा येथील अभिजित चव्हाण यांच्यासह राज्यभरातील ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरटे यांनी आजवर ग्रामपंचायत प्रशासनात केलेल्या कार्यामुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या निवडीमुळे ग्रामीण भागातील प्रश्नांना अधिक प्रभावीपणे न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कर्जत : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघाच्या राज्य कार्यकारिणीमध्ये कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी कैलास आबासाहेब तरटे यांची राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे कर्जत तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्याच्या शासकीय व प्रशासकीय वर्तुळात आनंद व्यक्त केला जात आहे.
सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात राज्य संघाचे अध्यक्ष टी. आर. पाटील, राज्य सरचिटणीस एस. डी. पाटील, राज्य उपाध्यक्ष सागर सरावणे, राज्य प्रसिद्धीप्रमुख नवनाथ गोरे तसेच जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत तरटे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्थेचे माजी व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक प्रशांत सातपुते, अकोले तालुका अध्यक्ष संतोष देशमुख, तसेच सातारा येथील अभिजित चव्हाण यांच्यासह राज्यभरातील ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तरटे यांनी आजवर ग्रामपंचायत प्रशासनात केलेल्या कार्यामुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या निवडीमुळे ग्रामीण भागातील प्रश्नांना अधिक प्रभावीपणे न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS