कर्जत : तालुक्यातील गायकरवाडी येथे ६० वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गोरख विठोबा वाघमारे (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने वाघमारे यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड किंवा तत्सम कठीण वस्तूने वार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना गुरुवारी घडली असावी, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी शेजारील व्यक्ती वाघमारे यांना हाक मारण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता ते जखमी अवस्थेत घरात पडलेले आढळले. याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाल्यानंतर वाघमारे यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. काही वेळापासून मृतदेह घरातच असल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याचेही निदर्शनास आले. या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण लोखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनीही पाहणी केली आहे. हा खून नेमका कोणत्या कारणातून व कोणी केला, याचा तपास सुरू असून, पोलिसांसमोर गुन्ह्याचा उलगडा करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. घटनेमुळे गायकरवाडी परिसरात नागरिकांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कर्जत : तालुक्यातील गायकरवाडी येथे ६० वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गोरख विठोबा वाघमारे (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने वाघमारे यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड किंवा तत्सम कठीण वस्तूने वार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना गुरुवारी घडली असावी, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी सकाळी शेजारील व्यक्ती वाघमारे यांना हाक मारण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता ते जखमी अवस्थेत घरात पडलेले आढळले. याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाल्यानंतर वाघमारे यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. काही वेळापासून मृतदेह घरातच असल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याचेही निदर्शनास आले.
या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण लोखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनीही पाहणी केली आहे.
हा खून नेमका कोणत्या कारणातून व कोणी केला, याचा तपास सुरू असून, पोलिसांसमोर गुन्ह्याचा उलगडा करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. घटनेमुळे गायकरवाडी परिसरात नागरिकांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS