Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र  

कोपरगाव :  कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुटमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदव

‘कृष्णप्रिया’ संस्थेचे बाल सुसंस्कार शिबीर उत्साहात
जालापूरमध्ये नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहावर अतिक्रमण; गायरान जमिनीत अडथळा करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे आदेश
सामनगावच्या सरपंच-उपसरपंचांविरोधातील ‘अविश्वास’ मंजूर
Gautam Polytechnic Institute Kopargaon Campus: Photos, Virtual Tour

कोपरगाव :  कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुटमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून तंत्रशिक्षण संचालनालय मार्फत गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, गौतमनगर महाविद्यालयामध्ये बुधवार दि. २० पासून प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र सुरु झाले असल्याची माहिती प्राचार्य वसीम शेख यांनी दिली आहे.
 महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षणालयाच्या संकेत स्थळावर प्रवेश घेवू इच्छिणा-या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. प्रवेशासाठी आवश्यक असणा-या आपल्या कागद पत्रांची पडताळणी भरलेल्या माहितीत सुधार करणे आणि ऑनलाईन फॉर्म निश्चिती करणे गरजेचे आहे. या केंद्रातून संस्था व शाखा निवड, विकल्प, अर्ज भरणे प्रवेशाच्या फे-या व प्रवेश घेवू इच्छिणा-या विद्यार्थ्याला हवे असलेले शैक्षणिक संकुल व हवी असलेली शाखा मिळावी यासाठी नवीन नियमावलीनुसार विकल्प अर्जातील विविध पर्यायावरील पसंती आदी बाबींची विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण माहिती दिली जाणार आहे.
 महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई, यांच्याकडून दहावीनंतरच्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. २० मे पासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया करावी लागणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडचणी येऊ नये यासाठी गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट गौतमनगर (कोळपेवाडी) येथे प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र नियुक्त केले आहे. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन प्रवेश प्रक्रियेतील येणाऱ्या अडचणी व शंका या सुविधा केंद्रास भेट देऊन दूर कराव्यात असे आवाहन प्राचार्य वसीम शेख यांनी केले आहे.

COMMENTS