Homeताज्या बातम्या

मध्य रेल्वेचा आज मेगा ब्लॉक; माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर लाईन्सवर लोकल सेवा प्रभावित

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुख्य लाईन्सवर आणि हार्बर लाईन्सवर रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी माटुंगा ते मुलुंड दरम्यान आणि

पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू होणार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा
गुरुपौर्णिमेनिमित्त सावली अर्बनमध्ये आदर्श शिक्षिकांचा सन्मान; ’सौभाग्यवती ठेव योजना’ विजेत्यांना बक्षीस वितरण
जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये भूस्खलन; केदारनाथ ट्रेकिंग मार्ग बंद, हरिद्वारमध्ये SDRF कडून तरुणाचे प्राण वाचवले
Mumbai Local Mega Block: Central, Western & Harbour Line Updates | मुंबई  रेल्वे मेगाब्लॉक अपडेट्स

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुख्य लाईन्सवर आणि हार्बर लाईन्सवर रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी माटुंगा ते मुलुंड दरम्यान आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही रेल्वे गाड्या उशिराने धावणार असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मेन लाईन्सवर हा ब्लॉक माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत असणार आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी सुटणाऱ्या ‘डाऊन’ जलद मार्गावरील गाड्या माटुंगा येथून ‘डाऊन’ धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

COMMENTS