Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भोर येथील चिमुकलीवर अत्याचार व हत्या प्रकरणाचा तीव्र निषेध; आरोपीस कठोर शिक्षा द्यावी – डॉ. ज्योती मेटे

बीड : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या निरागस बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली

महिला पोलिस अधिकार्‍याला 28 लाखांची लाच घेताना अटक
शेअर बाजार फसवणूक प्ररकणी चौघांचा जामीन नाकारला 
नसरापूर अत्याचार प्रकरणी संताप उसळला; आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा द्या; फास्ट ट्रॅक सुनावणीची जोरदार मागणी : निखिल लातूरकर

बीड : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या निरागस बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. या अमानुष कृत्याचा शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्षा डॉ. ज्योती मेटे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
सुट्टीसाठी आजोळी आलेल्या निष्पाप बालिकेला वासरू दाखवतो असे आमिष दाखवून सुमारे 60 वर्षीय व्यक्तीने केलेले हे कृत्य विकृतीचा कळस असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा नराधमांना समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे केवळ भोर तालुकाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. संबंधित आरोपीवर जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) खटला चालवून त्याला लवकरात लवकर कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गांभीर्याने करून भक्कम पुरावे गोळा करावेत, जेणेकरून आरोपी कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही. पीडित कुटुंबाला शासनाकडून तातडीने कायदेशीर मदत देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. अशा अमानवीय घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने गुन्हेगारांवर वचक बसेल अशी कठोर पावले उचलणे अत्यावश्यक असल्याचेही डॉ. ज्योती मेटे यांनी नमूद केले.

COMMENTS