Homeताज्या बातम्या

काश्मीरमध्ये दोन स्थलांतरित हिंदू मजुरांची हत्या; नावे विचारून दहशतवाद्यांनी केला गोळीबार, कुलगाम परिसरात शोधमोहीम सुरू

श्रीनगर: दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात छत्तीसगडमधील दोन स्थलांतरित हिंदू मजुरांचा मृत्यू झाला. विटभट्

नीट पेपरफुटी प्रकरणाचे देशभरात पडसाद! सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी
माती परीक्षणातूनच जमिनीचे आरोग्य सुधारेल; डॉ. भीमराव कांबळे यांचे प्रतिपादन, बेलापूर येथे शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचे वाटप
राजा रघुवंशी हत्याकांडातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशीचा जामीन रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका
कुलगाममध्ये २ स्थलांतरित मजुरांचा मृत्यू- WD Lite , काश्मीरमधील १०  दिवसांतील दुसरा दहशतवादी हल्ला

श्रीनगर: दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात छत्तीसगडमधील दोन स्थलांतरित हिंदू मजुरांचा मृत्यू झाला. विटभट्टीवर काम करणाऱ्या या मजुरांना आधी नावे विचारून त्यांची ओळख पटवण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर अतिशय जवळून गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा दलांनी शनिवारी परिसरात व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे.

अधिकृत माहितीनुसार, कुलगामपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या केलाम परिसरात शुक्रवारी रात्री हा हल्ला झाला. मृतांची ओळख २४ वर्षीय दीपक रात्रे आणि २८ वर्षीय भूपेंद्र अशी पटली आहे. गोळीबारात दीपक रात्रे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या भूपेंद्र यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थलांतरित मजुरांची नावे विचारली. त्यानंतर हिंदू असलेल्या या दोघांना इतरांपासून वेगळे करून त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. हल्ल्यावेळी तेथे अनेक मजूर उपस्थित होते; मात्र हिंदू मजूर हे दोघेच असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास तीन ते चार फेऱ्यांचा गोळीबार झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.

दहशतवाद्यांनी आधी परिसराची पाहणी करून लक्ष्य निश्चित केल्याच्या शक्यतेची तपासणी केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस, लष्कर आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला. संशयितांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. परिसरातील सर्व हालचालींवर सुरक्षा यंत्रणांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यात एका स्थानिक आणि एका परदेशी दहशतवाद्याचा सहभाग असण्याची शक्यता आहे. संशयितांबाबत माहिती गोळा करण्यात येत असून विविध अंगांनी तपास सुरू आहे. अधिकृत स्तरावर अद्याप सविस्तर निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

COMMENTS