Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निसर्ग प्रेमी रमाकांत डेरे यांच्या प्रकल्पांना परदेशी अभ्यासाकांची भेट

https://www.youtube.com/watch?v=gQiOZJLd8v4 नेदरलँड येथून आलेली हॅना ब्रदर वैगनिंगन आणि हैदराबाद मधून आलेले तारकराम यांनी नुकतीच ज्येष्ठ पर्

इज्तेमाच्या मंडप उभारणीचा माजी आ.अशोकराव काळेंच्या हस्ते प्रारंभ
नाळवंडी बस स्थानक परिसरात अज्ञात व्यक्तीकडून ‘महात्मा फुले चौक’ची स्थापना
प्रकल्प स्पर्धेतून विद्यार्थ्यांना नवसंशोधनाची संधी : उपसचिव देवेंद्र दंडगव्हाळ

नेदरलँड येथून आलेली हॅना ब्रदर वैगनिंगन आणि हैदराबाद मधून आलेले तारकराम यांनी नुकतीच ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ श्री. रमाकांत डेरे यांच्या राजूर येथील गारगोटी संग्रहालय तसेच जुन्या काळातील नाणी व पोस्टाची तिकिटे तसेच निसर्गातील विविध आकार असलेल्या लाकडांच्या प्रदर्शन दालनाला भेट दिली.

दगडांचा देव म्हणून प्रसिद्ध असलेल्या तसेच चंदन लागवडीला राजआश्रय मिळवून देणारे ज्येष्ठ शेती तज्ञ रमाकांत डेरे गेली पाच ते सहा दशके विविध क्षेत्रात आपली सेवा देत आहेत. शेतकऱ्यांचे व आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर असलेले रमाकांत डेरे यांच्याकडे विविध क्षेत्रातील मान्यवर भेटी देत असतात. त्यांचे सावरकुटे या आदिवासीबहुल गावातील फळबाग लागवडीचा प्रयोग देशभर गाजलेला आहे. नैसर्गिक स्त्रोतांचा योग्य वापर करून जीवनमान उंचावण्यासाठी फळबाग लागवडीतून स्थायी रोजगार निर्माण करण्यासाठी त्यांनी उभे केलेले मॉडेल सर्वांना प्रेरणा देणारे आहे. चंदन शेतीच्या माध्यमाने हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून पर्यावरण पूरक शेतीचा मार्ग त्यांनी दाखवला आहे. चंदनाला शेती प्रकारामध्ये समाविष्ट करण्यासाठी शासन दरबारी त्यांनी केलेला सत्याग्रह सर्वांना माहीत आहे. खाजगी मालकीच्या जमिनीत चंदन लागवड करून त्याची नोंद सातबारावर घेता येते हे केवळ रमाकांत डेरे यांच्या प्रयत्नातून शक्य झाले. रमाकांत डेरे यांचे जगभर मित्र परिवार विस्तारलेला आहे. या मित्रांच्या माध्यमातून जमा केलेले विविध देशातील पोस्टाची तिकिटे, चलनात असलेली व नसलेली विविध आकाराची नाणी , निसर्गात सापडलेले विविध आकारांचे दगड व गारगोटी, जंगलातील लाकडांचे विविध प्रकार व आकार , सागापासून बनवलेले भव्य दिव्य फर्निचर , जुन्या काळातील पुस्तके व नियतकालिके यांचा मोठा संग्रह त्यांच्या राजूर येथील दालनात बघायला भेटतो . बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून डेरे यांचा सर्वांना परिचय आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत नेदरलँड येथून आलेली हॅना ब्रदर वैगनिंगन यांनी त्यांची राजुर येथे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे विविध प्रयोग समजावून घेतले. समाजाप्रती असलेले त्यांचे विचार व कार्य सुमारे तीन तास वेळ देऊन जवळून बघितले. या भेटीचा मुख्य उद्देश ग्रामीण आणि भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणे व येथील जीवनचरित्रार्थ कशाप्रकारे चालतो , शेती आणि शेतीपूरक व्यवसाय , ग्रामीण आणि आदिवासी संस्कृती , या सर्व बाबींचा अभ्यास त्यांनी जवळून केला. या भेटीदरम्यान भारत देशातील अनेक आठवणी सोबत घेऊन जात आहे असे गौरवोद्गार त्यांनी यावेळेस काढले.

COMMENTS