Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकर्‍यांचे दिवाळे

कापूस, सोयाबीन आणखी किती महिने घरी ठेवणार?

धारूर प्रतिनिधी - मागील वर्षीच्या तुलनेत कापूस आणि सोयाबीनचे दर कमालीचे घसरले आहेत. आज भाव वाढेल, उद्या वाढेल या प्रतिक्षेत शेतकर्यांनी कापूस, स

खटाव तालुक्यातील येळीव तलावात माती माफियांचा रात्रं-दिवस धुडगूस
शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळणार, महावितरण आणि राज्य शासनाने आणली योजना 
प्रतापगडचा पुढील गळीत हंगाम संस्थापक पॅनेल नक्की सुरू करेल : सौरभ शिंदे

धारूर प्रतिनिधी – मागील वर्षीच्या तुलनेत कापूस आणि सोयाबीनचे दर कमालीचे घसरले आहेत. आज भाव वाढेल, उद्या वाढेल या प्रतिक्षेत शेतकर्यांनी कापूस, सोयाबीन घरात साठवून ठेवला आहे. चार- पाच महिने झाले भाव वाढण्याऐवजी वरचेवर कमीच होत आहे. यामुळे शेतकयांचे दिवाळे निघाले असून तो आणखी किती दिवस आणि महिने शेती माल घरात साठवून ठेवणार आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीड जिल्ह्याची खरी ओळख ऊसतोड मजूरांचा जिल्हा अशी आहे. अलीकडच्या काळात येथील शेतकरी भोगोलीक अडचणी आणि नैसर्गीक संकटांचा सामना करत ऊसतोड मजूरांचा जिल्हा ही ओळख पुसण्याचा प्रयत्न करत आहे. परंतू एकापाठोपाठ येणारी अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पेरलेले उगवत नाही, उगवलेले वाढत नाही, वाढलेले पदरात पडत नाही. नशीबाने पदरात पडलेच तर त्याला बाजारात मातीमोल भाव मिळतो. याही परिस्थितीत खचून न जाता धारूर तालुक्यात बहुतांश कोरडवाहू क्षेत्र असलेल्या भागातील शेतकरी अनंत अडचणींचा सामना करत नगदी पीक म्हणून कापूस, सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. परंतू निसर्ग साथ देत नाही. तरी देखील शेतकयांचे सारे कुटुंब रात्रंदिवस कष्ट करून, रक्ताचे पाणी करून चांगले उत्पन्न घेतात. कष्टामुळे प्राप्त परिस्थिती नसतानाही शेतकर्यांनी कापूस आणि सोयाबीनचे उत्पादन केले. परंतु बाजारात कापसू आणि सोयाबीनचे भाव पार कोसळले. एवढ्या कष्टाने घेतलेले उत्पादन मातीमोल भावात विकायचे नाही म्हणत शेतकर्यांनी ते घरात साठवून ठेवले आहे. सुरूवातील कापसाला 9 हजार रूपये भाव होता. परंतू मागील वर्षी दहा हजारांपेक्षा अधिक भाव मिळाला असल्याने शेतकयांनी भाव वाढीच्या प्रतिक्षेत कापूस घरात साठवून ठेवला. पाच- सहा महिने झाले, भाव वाढ होण्याऐवजी रोज भाव कमी होत आहे. सरूवातील 9 हजार प्रति क्विटल असलेला भाव सात हजार सातशे वर आला आहे. यामुळे कापूस घरातच पडून असून मुलांचे शिक्षण, कुटुंबातील विवाह समारंभ, आजार, पेरणी, फवारणी यासाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर वाढत आहे. कापसू- सोयाबीनच्या भाववाढीच्या प्रतिक्षेत शेतकयांचे दिवाळे निघू लागल्याचे चित्र धारूर तालुक्यात दिसून येत आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

COMMENTS