Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रयत सेवक बँकेची उल्लेखनीय कामगिरी 

कोपरगाव  : पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लि., सातारा या बँकेने ३१ मार्च २०२६ अखेरची आर्थिक

रोहमारे महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल  
संजीवनी आश्रमशाळेच्या माजी विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी : कोल्हे

कोपरगाव  : पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लि., सातारा या बँकेने ३१ मार्च २०२६ अखेरची आर्थिक स्थिती जाहीर केली असून बँकेची एकूण कामगिरी समाधानकारक राहिली आहे. बँक एफएसडब्ल्यूएम वर्गात असून ऑडिट वर्ग सातत्याने ‘अ’ असल्याची माहिती बँकेने दिली.

सन २०२४-२५ च्या तुलनेत २०२५-२६ या आर्थिक वर्षात बँकेच्या भागभांडवलात वाढ होऊन ते ७७.७३ कोटींवरून ८०.८४ कोटींवर गेले आहे. एकूण निधी ११२.१६ कोटींवरून ११६.९१ कोटींवर पोहोचला आहे. ठेवींमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली असून ९६.२४ कोटींची वाढ होऊन एकूण ठेवी १६९१.८८ कोटी झाल्या आहेत.

कर्ज वितरणातही वाढ झाली असून कर्जरक्कम १०४४.७५ कोटींवरून १०७४.२१ कोटींवर पोहोचली आहे. बँकेचा सीडी रेशो ६३.४९ टक्के असून एकूण व्यवसायात १२५.७० कोटींची वाढ होऊन तो २६४०.३९ कोटींवरून २७६६.०९ कोटींवर गेला आहे.

बँकेला चालू वर्षात १४.९६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. एकूण एनपीए ८.२५ कोटींवरून ८.२० कोटींवर आणण्यात यश आले असून एनपीएचे प्रमाण ०.७९ टक्क्यांवरून ०.७६ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. कर्जदार सभासदांना कर्जाच्या व्याजावर दोन टक्के रिबेट देण्यास संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. बँकेच्या गुंतवणुकीतही वाढ झाली असून ती ७०८.०३ कोटींवरून ७९७.४६ कोटींवर पोहोचली आहे.   या प्रगतीमध्ये बँकेचे चेअरमन नंदकिशोर गायकवाड,व्हा. चेअरमन दिलीप डहाळे, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी भास्कर कणसे, जनरल मॅनेजर दत्तात्रय काकडे, सहायक महाव्यवस्थापक विनायक देसाई, विभागप्रमुख, शाखाधिकारी व सेवकवर्ग यांचे योगदान आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बँकेच्या कामगिरीचे अभिनंदन केले.

COMMENTS