पारनेर : पारनेर तालुक्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जनावरांसाठी चारा व पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून शेतकऱ्यांसमो

पारनेर : पारनेर तालुक्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जनावरांसाठी चारा व पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन सादर करून तातडीने टँकर आणि चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली.
गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात दुष्काळी परिस्थिती कायम असून, यंदा मान्सूनला होत असलेल्या विलंबामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. अनेक गावांमध्ये आणि वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, आपले पशुधन टिकविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. या गंभीर परिस्थितीचा विचार करून शासनाने जनावरांसाठी तातडीने सरकारी चारा डेपो व चारा छावण्या मंजूर कराव्यात, तसेच बाधित भागात पिण्याच्या पाण्याचे टँकर तातडीने सुरू करावेत, अशी प्रमुख मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र गाडगे, तालुका सचिव नारायण नरवडे, तालुका उपाध्यक्ष वीरेंद्र थोरात, शहराध्यक्ष सतीश म्हस्के, सुपा शहराध्यक्ष अक्षय सूर्यवंशी, बाबू कोठावळे आणि सुरज गोरे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. “शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पावले उचलावीत, अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल.या कठीण काळात मनसे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे,” असा इशारा अविनाश पवार यांनी दिला आहे.

COMMENTS