Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तिकाडे-शिंदे वस्तीपर्यंतचा शेतरस्ता अखेर खुला; शेतकर्‍यांचा समन्वय यशस्वी

शिरूर : हिवरसिगा सज्जा अंतर्गत शिवहद्दीपासून तिकाडे-शिंदे वस्तीपर्यंतचा अनेक वर्षांपासून तुंबलेला पारंपरिक शेतरस्ता अखेर शेतकर्‍यांच्या समन्वयातू

डॉ. पिपाडा यांनी घेतली गृहमंत्री शहा यांची भेट
‘निळवंडे’च्या शेजारील पिंपरकणे गावात पाणी टंचाई; संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे
उंडेमळा शाळेतील विविध उपक्रम कौतुकास्पद : गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड

शिरूर : हिवरसिगा सज्जा अंतर्गत शिवहद्दीपासून तिकाडे-शिंदे वस्तीपर्यंतचा अनेक वर्षांपासून तुंबलेला पारंपरिक शेतरस्ता अखेर शेतकर्‍यांच्या समन्वयातून खुला करण्यात आला. या उपक्रमामुळे परिसरातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सदर शेतरस्ता खुला करण्यासाठी तहसीलदार सुरेश घोळवे, मंडळाधिकारी शहादेव सानप, ग्राममहसूल अधिकारी बाळासाहेब बागर, उपसरपंच विश्वाभर शिंदे, ग्रामरस्ता समितीचे माऊली शिंदे, शिवराम राऊत, तसेच रामेश्वर पाडुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यवाही करण्यात आली. यावेळी दोन्ही बाजूंच्या शेतकर्‍यांनी समंजसपणा दाखवत मध्यभागातून प्रत्येकी 6 फूट जमीन सोडून दिली. त्यातून गट क्रमांक 140, 139, 138 मधील सुमारे 1 किमी लांबीचा व 12 फूट रुंदीचा शेतरस्ता प्रत्यक्ष वहिवाटीस खुला करण्यात आला. तसेच तात्काळ मोजमाप करून सीमांकन करण्यात आले. उपसरपंच विश्वाभर शिंदे यांनी या रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण करण्याची हमी दिली. दोन्ही बाजूंच्या शेतकर्‍यांमध्ये समन्वय साधण्यासाठी शिवराम राऊत (अध्यक्ष, शिवश्री कृषी मंडळ) यांनी विशेष परिश्रम घेतले. तहसीलदारांनी हा रस्ता महसूल अभिलेखात इतर हक्क म्हणून नोंदवून गावनकाशात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या वेळी धर्मराज शिंदे, प्रकाश सालपे, संतोष मिसाळ, रमेश मिसाळ, श्रीनिवास राऊत, प्रदीप बोराडे, भागवत गायकवाड, त्र्यंबक शिंदे, साईनाथ शिंदे, अरुण तिकाडे, अश्रुबा शेळके, कृष्णा शिंदे, स्वप्निल गायकवाड यांच्यासह संबंधित गटातील शेतकरी उपस्थित होते. तसेच स्थळ पाहणी पंचनामा, संमतीपत्र व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा शेतरस्ता खुला झाल्याने शेतकर्‍यांनी प्रशासन व स्थानिक पदाधिकार्‍यांचे आभार मानले.

COMMENTS